pandharpur, Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Kharkhana
pandharpur, Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Kharkhana saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : राष्ट्रवादीशी जवळीक असणारा कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याशी घेणार पंगा, फुंकले रणशिंग

भारत नागणे

Pandharpur News : राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे (ncp leader kalyan kale) यांच्यासमोर त्यांच्या पक्षाशी निकटचे संबंध असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अभिजीत पाटील (abhijeet patil) यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. पाटील यांनी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Kharkhana Election) सभासदांच्या आग्रहास्तव मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. (Breaking Marathi News)

पंढरपूर येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सभासद कार्यकर्त्यांची बैठक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीत पाटील यांनी कारखान्याच्या निवडणूकी विषयी सभासदांची मते जाणून घेतली.

यावेळी अनेक सभासदांनी निवडणूक लढवावी असा आग्रह केला. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी निवडणूक लढवणार अशी घोषणा केली. पाटील यांच्या घोषणेमुळे कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने पंढरपुरात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT