अभिजित बिचकुले
अभिजित बिचकुले  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Election: मी निवडणुकीस उभा राहणार असा जावईशोध- अभिजित बिचकुले

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

संभाजी थोरात

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुक होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत, मात्र अभिजित बिचुकले ही रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. पण अभिजित बिचकुले (Abhijit Bichakule) यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

अभिजित बिचकुले म्हणाले, "मी काल महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर मध्ये आलो होतो. योगायोगाने कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर झाली त्यामुळे मी निवडणुकीस उभा राहणार असा जावईशोध लावला गेला. मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू, कोल्हापूरचे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे काही जणांना भेटून निर्णय घेऊ," असे अभिजित बिचकुले यांनी सांगितले आहे.

तर निडणुकीसाठी, कॉंग्रेसकडून आमदार चंद्रकांत जाधव (Congress MLA Chandrakant Jadhav) यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणुक रिंगणात असणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून कोण असेल याची उत्सुकता होती. सत्यजित कदम यांच्या रूपाने भाजपाने तगडा उमेदवार मैदानात आणला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजपाचा आमदार नसल्याची खंत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना होती ती भरून काढण्यासाठी आता भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसही कोल्हापूर उत्तर मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित.

काँग्रेस बरोबरच पंजाब निवडणुकीत सत्ता आल्याने आत्मविश्वास वाढलेल्या आप ही संदीप देसाई यांना रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपने तर प्रचाराची पहिली फेरी पूर्ण ही केली आहे. या तिन्ही उमेदवाराबरोबरच करुणा शर्मा या शिवसंग्राम पक्षाच्या वतीने लढणार आहेत, महिलांच्या हक्कासाठी त्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर आतापर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले अभिजित बिचुकले ही रिंगणात असणार अशी चर्चा होती.

हे देखील पहा-

तर, या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष होते. यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

SCROLL FOR NEXT