कोल्हापूरातील पोटनिवडणुक पंचरंगी; करुणा शर्मा, अभिजित बिचुकलेही मैदानात

बिनविरोध होणार अशी चर्चा असलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक पंचरंगी होणार असल्याच स्पष्ट झालंय.
Karuna Sharma
Karuna SharmaSaam TV
Published On

कोल्हापूर : बिनविरोध होणार अशी चर्चा असलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly By-election) पंचरंगी होणार असल्याच स्पष्ट झालंय. या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत, मात्र करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि अभिजित बिचुकले हेही रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक चर्चेची होणार हे निश्चित.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुक होणार आहे. जाधव यांच्या मृत्यू नंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती, मात्र त्यांचे प्रयत्न निषफळ ठरले आहेत. सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी निश्चित करून भाजपा (BJP) कामालाही लागले आहे.

Karuna Sharma
'कंस, रावणाची आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही, तिथे तुम क्या चिज हो शरदबाबू ?'

कॉग्रेसकडून आमदार चंद्रकांत जाधव (Congress MLA Chandrakant Jadhav) यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणुक रिंगणात असणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून कोण असेल याची उत्सुकता होती. सत्यजित कदम यांच्या रूपाने भाजपाने तगडा उमेदवार मैदानात आणला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजपाचा आमदार नसल्याची खंत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना होती ती भरून काढण्यासाठी आता भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसही कोल्हापूर उत्तर मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित.

काँग्रेस बरोबरच पंजाब निवडणुकीत सत्ता आल्याने आत्मविश्वास वाढलेल्या आप ही संदीप देसाई यांना रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपने तर प्रचाराची पहिली फेरी पूर्ण ही केली आहे. या तिन्ही उमेदवाराबरोबरच करुणा शर्मा या शिवसंग्राम पक्षाच्या वतीने लढणार आहेत, महिलांच्या हक्कासाठी त्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एवढच नव्हे तर आतापर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले अभिजित बिचुकले ही रिंगणात असणार आहेत.

महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागणार हे स्पष्ट असल्याने शिवसेना आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता नाही. तरीही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपा असे घुमशान रंगणार हे स्पष्ट आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com