अभिजित सोनावणे
नाशिक: आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा आहे ती म्हणजे खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सोबत हातमिळवणी करण्यासाठी दर्शवलेली तयारी. जलील यांच्या मते भाजपला (BJP) जर हरवायचे असेल तर आपण एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षांचं नवीन समीकरण आता जुळणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर एमआयएम आणि शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच नाही, अशी शिवसेनेची (Shivsena) ठाम भूमिका आहे. तर, यावर इम्तियाझ यांनीच MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं असा सल्ला राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
MIMच्या ऑफरबद्दल बोलत असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "खासदार जलील MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं. जलील यांना यांना राष्ट्रवादीत घेऊ, MIM ला नाही. त्यांनी MIM चा राजीनामा देऊन जलील यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं. शरद पवार (Sharad Pawar) त्यांना नक्की पक्षात घेतील," असा टोला मंत्री भुजबळ यांनी जलील यांना लगावला आहे.
पहा व्हिडीओ-
"शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा";
दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) बैठक झाली असल्याचे समोर आले होते. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. तसेच यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत आपला निरोप पोहोचवा अशी विनंती केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.