Soygaon Nagar Panchayat Election Result Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद: सोयगावात शिवसेनेचे वर्चस्व, अब्दुल सत्तारांनी राखला गड

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी (Soygaon Nagar Panchayat Election Results) आज बुधवारी (ता.19) मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण सतरा जागांसाठी मंगळवारी (ता.18) मतदान झाले.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी (Soygaon Nagar Panchayat Election Results) आज बुधवारी (ता.19) मतमोजणी पूर्ण झाली आहे. मंगळवारी (ता.18) मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आजच्या मतमोजणीनुसार 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने 6 जागांवर विजय मिळविला आहे. (Soygaon Nagar Panchayat Elections 2022 Result)

अशा एकूण 17 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व राज्याचे यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली आहे. हे दोघेही पारंपरिक राजकीय विरोधक आहेत.

मागील वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली होती. नगराध्यक्ष पदाचीच चर्चा सोयगावात सुरु झाली असल्याने सोयगावात पुन्हा नगराध्यक्षपदावरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या तेरा जागा आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या चार जागा अशा एकूण 17 जागांसाठी अखेरीस सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली आहे. वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतीक्षा बुधवारी संपली आहे. (Nagar Panchayat Election Results 2022)

हे देखील पहा-

औरंगाबाद : सोयगाव नगरपंचायत निकाल

शिवसेना : 11

भाजप : 6

1) शीहीस्ताबी रउफ शहा - शिवसेना

2) अक्षय काळे - शिवसेना

3) दीपक पगारे - शिवसेना

4) हर्षल काळे - शिवसेना

5) वर्षा घनघाव - भाजपा

6) संध्या मापारी - शिवसेना

7) सविता जावळे- भाजपा

8) कुसुम दुतोंडे - शिवसेना

9) सुरेखा काळे - शिवसेना

10) संतोष बोडखे - शिवसेना

11) संदीप सुरडकर - भाजपा

12) भगवान जोहरे - शिवसेना

13) ममताबाई इंगळे- भाजपा

14) कदिर शहा - भाजपा

15) सुलताना रऊफ - भाजपा

16) गजानन कुडके - शिवसेना

17) आशाबी तडवी - शिवसेना

(Soygaon Nagar Panchayat Election Results live)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT