5G तंत्रज्ञानाचा विमानांना धोका? Air India ने केली अनेक उड्डाणे रद्द, अलर्ट जारी !

5G इंटरनेट सेवा (5G internet deployment) आजपासून म्हणजे बुधवारपासून अमेरिकेतील विमानतळांवर (US Airport) लागू केली जात आहे.
AIR-INDIA
AIR-INDIA Saam Tv
Published On

5G इंटरनेट सेवा (5G internet deployment) आजपासून म्हणजे बुधवारपासून अमेरिकेतील विमानतळांवर (US Airport) लागू केली जात आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या (AIR- India) विमानसेवेवर परिणाम होणार आहे. एअर इंडियाने अमेरिकेला जाणारी काही उड्डाणे रद्द केली आहेत, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. खुद्द एअर इंडियाने ही माहिती दिली आहे. एअर इंडियाशिवाय एमिरेट्सनेही (Dubai Emirates Airlines) उड्डाणे स्थगित केली आहेत. सर्व निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाइन्सनीही (Japan airlines) अमेरिकेची उड्डाणे स्थगित केली आहेत. (5G network in USA)

तर, 5G तंत्रज्ञानामुळे, एअरलाइन कंपनी एअर इंडियाने ता. 19 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून भारतातून (India) अमेरिकेला (America) उड्डाण करणार्‍या विमानांची सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. एअर इंडियाने आज अमेरिकेला जाणारी काही उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. (5G Internet On US Airport news In Marathi)

ही उड्डाणे रद्द;

जे विमान अमेरिकेला जाणार होते आणि आता रद्द करण्यात आले आहेत याची माहिती ट्विटमध्ये एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाने ट्विट करून लिहिले की, 'अमेरिकेत 5G इंटरनेट सेवेमुळेआम्ही 19 जानेवारीला काही उड्डाणे भरवणार नाही.' कंपनीने रद्द केलेल्या फ्लाइट्सची नावे- AI101/102, DEL/JFK/DEL, AI173/174, DEL/SFO/DEL, AI127/126, DEL/ORD/DEL, AI191/144, BOM/EWR/BOM आहेत.

AIR-INDIA
Police Raid: सात महिलांना जुगार खेळताना पकडले; गुन्हा दाखल

5G तंत्रज्ञान फ्लाइटला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखू शकते;

युएसमध्ये 5G कम्युनिकेशन तंत्रज्ञान लागू झाल्यामुळे 19 जानेवारीपासून एअरलाइनवर परिणाम होणार असून त्यात बदलही पाहायला मिळतील, असे एअरलाइनने म्हटले आहे. आजपासून अमेरिकेत 5G तंत्रज्ञान सुरू होत आहे.

याचा थेट परिणाम विमानांच्या लँडिंगवर होऊ शकतो. तसेच याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि 5G तंत्रज्ञान विमान कंपन्यांच्या कामात अडथळा निर्माण करू शकते, असे एअरलाइन उद्योगाचे म्हणणे आहे. (5G Netwok)

या कंपन्यांचे म्हणणे आहे की धावपट्टीवर 5G तंत्रज्ञानाची लँडिंग नसावी. कंपन्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, 5G तंत्रज्ञानामुळे विमानाचे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टम लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखू शकते. अशा स्थितीत विमानांच्या लँडिंगमध्ये अडचण येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com