Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit  Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar First Reaction : माझं खातं बदललं मी खूश आहे, अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; पण चेहरा बरंच काही सांगून गेला...

Political News : धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप आज जाहीर झालं. या खातेवाटपात अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला. अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

खातं बदलण्याची मीच विनंती केली

कृषिमंत्रिपद गेल्यानंतर बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांसाठी अंतिम असतो. मी नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती केली होती की मला खातं बदलून द्या. माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आहे.

शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला

मी या निर्णयावर खूश आहे. कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी काम केलं. सरकारला सूचवलेल्या अनेक योजना राबवल्या गेल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी मागील वर्षभर केला. हे सर्व काम करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मदत झाली, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

जे काम केलं ते लोकांसमोर आहे

वर्षभर कृषी खातं सांभाळलं. शेतकरी आस्मानी संकटात सापडतो त्यावेळी त्याला मदत करणे अपेक्षित असतं, तीही केली. वर्षभराच्या कार्यकाळात वेगाने निर्णय घेतले आणि अमंलबजावणी देखील वेगाने झाली. जे काम केलं ते लोकांसमोर आहे. पणन विभागही शेतकऱ्यांशी संबधित आहे. मला अपेक्षेपेक्षा जास्त मोठी खाती मिळाली, त्यामुळे मी समाधानी असल्याचंही त्यांनी म्हटलं. (Latest Political News)

धनंजय मुंडे माझ्यापेक्षा चांगलं काम करतील

कृषिमंत्रिपदाची जबाबदारी आता धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. धनंजय मुंडे साहेब तरुण आहेत. काम करण्यात ते सक्षम आहे. माझी काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांच्या डोक्यात शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी वेगळं काही नक्की असेल. मराठवाड्याचे हे सुपूत्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतील. धनंजय मुंडे माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करतील अशी मला अपेक्षा आहे, असंही अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटलं. (Tajya Marathi Batmya)

मात्र नेहमी स्पष्ट आणि बेधडकपणे बोलणारे अब्दुल सत्तार आज काहीसे शांतपणे बोलताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही बरंच काही सांगत होते. त्यामुळे बोलून दाखवत नसले तरी अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT