Abdul Sattar Updated Portfolio : अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! कृषिमंत्रीपद का गेलं? आता कोणतं खातं उरलं?

Maharashtra Cabinet Allocation : कृषिमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit
Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit Saam TV
Published On

Mumbai News : राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. मागील १२ दिवसांपासून या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. खातेवाटपाआधी अर्थ खात्याची जोरदार चर्चा होती, की हे खातं अजित पवार यांच्याकडे येणार की नाही.

मात्र हे खातं अखेर अजित पवारांना मिळालं आहे. मात्र आता चर्चा कृषी खातं आणि अब्दुल सत्तार यांची सुरु झाली आहे. कारण या खातेवाटपानंतर सर्वात मोठा धक्का हा अब्दुल सत्तार यांना बसला आहे.

अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. आता ही जबाबदारी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit
Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; कुणाला कोणतं खातं, पाहा डिटेल्स

अब्दुल सत्तार यांच्याकडे कोणतं मंत्रिपद उरलं?

कृषिमंत्रीपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खात्याची जबाबदारी असणार आहे.  (Political NEws)

कृषी विभागाची धाड भोवली?

अकोल्यातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांवर कथित छापे टाकल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार वादात सापडले होते. छापे टाकणाऱ्या कृषी विभागाच्या पथकात सत्तार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) दीपक गवळी हे देखील होते. त्यांच्यावर व्यावसायिकांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोपही होता. मात्र कृषि विभागाच्या धाडीत सत्तार यांचा पीए असल्याने हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. सत्तार यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र हेच धाड प्रकरणी सत्तार यांना भोवलं असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

आरोप आणि वादग्रस्त वक्तव्ये

याशिवाय टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्यानेही ते अडचणीत सापडले होते. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानेही त्यांची अडचण वाढली होती.

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर बोलताना शेतकरी आत्महत्या ही काही नवीन गोष्ट नाही, असं असंवेदनशील वक्तव्यही त्यांनी केलं होतं. यावरुनही शिंदे सरकारवर टीका झाली होती.

याशिवाय सिल्लोडमधील भाजप कार्यकर्ते देखील त्यांच्या कारभारावर नाराज होते. सत्तार यांना कृषिमंत्रिपदावरुन काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com