नगरपरिषद निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुतीतर्फे नाशिक जिल्ह्यात एकत्रित निवडणुका लढल्या जातील असे बोलले जात होते. मात्र अजित पवार गटातर्फे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव,मनमाड,येवला येथे शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती न करण्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्याला कांदे विरुद्ध भुजबळ हा वाद सर्वश्रुत आहे. मात्र अखेर नांदगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांचा हवाला देत नांदगाव नगरपरिषदे शिवसेना-भाजपा युतीचे पत्र एकमेकांना देत निवडणुकीसाठी युतीचे पाऊल पुढे टाकले आहे. नांदगावमध्ये युती झाली असली तरी मनमाडमध्ये महायुतीचे तिघे घटक एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.
सोमवारी जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार....
जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजपचे कमळ फुलणार..
करमाळ्यातील शिवसेनेचे युवक नेते दिग्विजय सिंह बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील..
पंढरपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
पुण्यात येरवडा येथील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी आरोपीला घडवली अद्दल
येरवडा येथील पेट्रोल पंपावर 12 नोव्हेबर रात्री येरवडा येथील पेट्रोल पंपावर कर्मचारीला मारहाण केली होती
या हल्ल्याच्या प्रकरणी पोलिसानी गुन्हा नोंद केला होता.
पोलिसांनी केली आरोपींना अटक
रायगडच्या कर्जत दिवाणी न्यायालयातून कामकाज आटोपून मुद्रे गावाकडे निघालेले वकील यांच्या कारमधील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट चार ते पाच मोटरसायकलस्वार लोकांना धडकल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज दादर शिवतीर्थ येथे मनसेची महत्वाची बैठक आहे. बैठकीला मुंबईतील महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
कोपरगाव तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. चांदेकसारे हद्दीत दगडाच्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून दोघा बहीण भावाचा मृत्यू झाला.
मुंबईच्या भायखळा (पश्चिम) येथील हबीब मॅन्शन, हंस रोड परिसरात दुपारी इमारतीच्या पायाभरणी आणि पायलींगच्या कामादरम्यान गंभीर दुर्घटना घडली. काम सुरू असताना अचानक मोठ्या प्रमाणात माती आणि मुरूम काम करणाऱ्या मजुरांवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे...नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे...शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल साडेअकराशे पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली आहे... दरम्यान वन विभागाला लागणाऱ्या साहित्यापासून ते वाहनांपर्यंत सर्व सुविधा डीपीटीसीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातील, त्यात 22 वाहनाचा सहभाग असेल... याशिवाय, जिल्ह्यात पकडलेल्या बिबट्यांपैकी तब्बल 200 बिबट्यांना ‘वन तारा’ प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे...त्या प्रस्तावाला लवकरच मंजूरी मिळेल... शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षकांसह शालेय शिक्षण समितीवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... बिबट्या पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी पुढे आले तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे...बिबट्या हा शेड्युल - वनमध्ये असल्याने ठार करता येत नाही... त्यामुळे त्याला शेड्युल–वनमधून वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहोत असंही विखे म्हणाले
रावेत येथील डी वाय पाटील कॉलेजच्या मेन बिल्डिंग समोर भामट्या प्रोफेसर ला फसवणूक झालेल्या महिलांच्या नातेवाईकांनी चांगला चोप दिला आहे. स्वतःला डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचे सांगून हा लबाड व्यक्ती मेट्रोमोनी साइटवर महिलांशी जवळीक निर्माण करून महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करायचा अशी माहिती समोर येत आहे. फसवणूक झालेल्या महिलांचे नातेवाईक लबाड प्रोफेसर ला चोप देत असतानाचे विडियो समाज माध्यमांवर आता झपाट्याने वायरल झाले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी पोलीस स्टेशन हद्दीत नितीन शंकर गिलबिले या 37 वर्षाच्या युवकाची बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नितीन शंकर गिलबिले ची हत्या झाल्यानंतर त्याच्या हत्येच्या कटात सहभागी असलेले चार मारेकरी हे काळ्या रंगाच्या फॉर्चूनर ने पसार झाले होते या गुन्ह्यातील चाराही आरोपींना अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून बेड्या ठोकल्या आहेत. अमित जीवन पठारे वय 35 वर्ष, विक्रांत सुरेश ठाकूर वय 38 वर्ष आणि सुमित फुलचंद पटेल वय 31वर्षे
आणि आकाश सोमनाथ पठारे वय 23 वर्ष या चार आरोपींना सध्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक वादातून या चारही आरोपींनी नितीन शंकर गिलबिले चा बंदुकीतून गोळ्या झाडून खून केल्याचं पोलीस तपासात उघडतीस आला आहे. तसेच या गुन्ह्यत वापरलेली फॉर्चूनर कार पोलीस आणि जप्त केली असून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली बेकायदेशीर बंदूक कुठून आणली याचा शोध पोलीस घेत आहेत.
अमरावतीतून मोठी धक्कादायक बातमी...
तृतीयपंथीयांचा बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
अवैध आणि बळजबरीने धर्मांतरण करण्याचे मोठ्या रॅकेट अमरावती सक्रिय असल्याचा भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा आरोप
तृतीय पंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण केल्याप्रकरणी अमरावतीतील तृतीयपंथी पोहोचले खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात...
तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं केलं होते मुस्लिम धर्मात धर्मांतरण.
मात्र धर्मांतर नंतर किन्नरावर वारंवार अत्याचार होत असक्याने पुन्हा महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनि कुंभमेळ्यात विधीवत हिंदू धर्मात प्रवेश केला
मात्र तुम्ही पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारा यासाठी काही मुस्लिम किन्नरांनी हिंदू किनारांवर तलवार घेत हल्ला केला..त्यामुळे किन्नरामध्ये भीतीचे वातावरण
अमरावती जिल्ह्यातिल दोन तुतीय पंथीयांच मुस्लिम धर्मांत धर्मांतरण केल्याचा आरोप
बजरंग टेकड़ी वरुण काही दिवसानापूर्वी भांडण झाल ते धर्मांतर वरुण झाल होत..
एक मौलवी आहे जो अमरावती येथील किन्नरांना मुस्लिम मध्ये धर्मांतर करून घेतले-खासदार अनिल बोडे
धर्मांतरण न केल्याच्या वादावरून मिर्ची पाउडर, तलवारी घेऊन आमच्यावर हल्ला केला - तृतीयपंथीयांचा आरोप
पोलिसांनी तात्काळ हल्ले करणाऱ्या किन्नरावर कारवाई करण्याची खासदार बोंडे यांची मागणी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवरच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे. कोल्हापुरात देखील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात मेळावे घेत आहेत. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीसाठी जागांबाबत मित्रपक्षांशी समन्वयाने चर्चा करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसंच सन्मानाने जागा न मिळाल्यास स्वबळावर लढा आणि संघर्ष करा. एकजुटीने महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलय. इचलकरंजी शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असही या मेळाव्यात त्यांनी म्हटलंय..
नगर परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर मनमाड पोलिस सर्तक झाले असून पोलिसांनी धडक कारवाई करत निवडणूकी पुर्वी विवेकानंद भागातील २४ वर्षीय कृतीक संजय धिवर या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्टल,दोन जीवंत काडतूस तसेच अन्य हत्यारे जप्त केलीय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून निवडणूकीच्या काळात पोलिस अधिक सर्तक झाल्याच पहावयास मिळत आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी आज शिर्डीत साईदर्शनाला हजेरी लावलीय.. राजकीय विषयावर त्यांनी बोलणं टाळलं मात्र येणाऱ्या अधिवेशनात आम्ही सरकार विरोधात ठोस भुमिका घेणार असल्याचं त्यांनी म्हणटलंय.. तर दिल्ली बाॅम्बस्पोटातील आरोपींसह देशाविरोधात काम करणारांना इतके कठोर शासन झालं पाहीजे कि पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय... आम्ही सर्व पक्ष बाजूला ठेऊन भारतीय म्हणून सरकार सोबत असल्याचे चड्डा म्हणाले..
मनमाड बायपासवर गावकर्यांचा रास्ता रोको आंदोलन अखेर मागे
जोपर्यंत संबंधित बिबट्याला ठार मारण्याचे लेखी आदेश पाच वाजे पर्यंत वन विभागाला मिळणार असल्याचे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे...
तर रास्ता रोको मुळे नगर - मनमाड बायपास वर वाहणांच्या लागल्या रांगाचं रांगा..
नंदुरबार खांडबारा रस्त्यावर बस आणि कारचा अपघात.
शिवण फाट्याजवळ चोपडा सुरत बस अपघातग्रस्त
अपघातात पाच शिक्षक किरकोळ जखमी.
खांडबारा ॲग्रीकल्चर हायस्कूल मधील 5 शिक्षक खांडबारा होऊन नंदुरबारला कार ने परतताना शिवण फाट्याजवळ चोपडा सुरत ठोस दिल्याने अपघात.
अपघातात कार आणि बस चे कोठ्या प्रमाणात नुकसान
माण-घोटवडे रस्त्यावरील बापूजीबुवा घाटात एका मोकाट बैलाने अचानक चारचाकी गाडीला अडवून हल्ला करण्याचा केला प्रयत्न
चारचाकी गाडी अडवत बैलाने शिंगानी गाडीला मारल्या धडका
या घटनेवेळी समोरच्या बाजूला उभ्या असणाऱ्या ट्रक्टर चालकाने, प्रसंगावधान दाखवत ट्रॅक्टरने या चारचाकी वाहनाला धडक मारणारा बैल बाजूला करून हुसकावून लावला
वाशिम पालिकेसाठी आज शिवसेना ठाकरे गटाकडून अध्यक्ष पदाकरिता दुसरे नामांकन दाखल करण्यात आले आहे, रेखा मापारी यांच्या नावाने दुसरा अर्ज दाखल करण्यात आला आहे
रेखा मापारी ह्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात ट्विस्ट बघायला मिळालाय...
काल शिवसेना ठाकरे गटात कडून अध्यक्ष पदाकरिता जिल्हा उपाध्यक्ष नागोराव ठेंगडे यांनी अर्ज दाखल केला होता.
आज विद्यमान जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांनी सुद्धा वाशिम नगर पालिकेच्या अध्यक्ष पदाकरिता नामांकन दाखल केल्यामुळे नेमका आता पक्षाकडून एबी फॉर्म कुणाला मिळतो आणि ठाकरेच्या शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी कोणाला जाहीर होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून जिल्ह्यात अद्याप महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरण्यास सुरवात केलीय.
निवडणूक आयोगाने ऑनलाइन ऑनलाइन अर्ज भरता येईल असे जाहीर केले तर रविवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.,
तर दुसरी कडे बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशी पक्षाचे एबी फॉर्म देण्यात असल्याने अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे
बहुतांश आदिवासी समाज शहरापासून दूर असल्याने विकास होणे गरजेचे आहे.
आदिवासी लोकांना हस्तउद्योगच्या नाध्यानातून प्रगतीसाठी प्रयत्नरत आहे..
समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मागील 27 वर्षांपासून मानकर ट्रस्टच्या माध्यमातून काम करत आहे...
आदिवासी मुलींना नागपुरात शिक्षणासाठी आणले, आदिवासी मुळा मुलीत गुण आहे...
जल जमीन जंगल जानवर यात सर्व क्षेत्रात विकासाचा काम सरकार करत आहे.
झारखंडमध्ये आदिवासी समाजाचा इतिहास माहीत आहे,
नांदेडच्या किनवट शहरात आज पहाटे मोठी दुर्घटना घडली. जैन प्रसन्न आणि रंग वैभव कलेक्शन या दोन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. ही घटना रात्री घडली. आगीचा फैलाव इतका प्रचंड होता की तब्बल दोन तासापर्यंत आग नियंत्रणात आणणे अग्निशमन दलाला कठीण गेले. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर अखेर आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखोंचा माल जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काल बिहार विधानसभा निवडणूकीचे निकाल लागलेत... यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी प्रतिक्रिया देत म्हटल आहे की, महाराष्ट्रात जे घडवलं तेच बिहारमध्येही घडवलं आहे. स्वायत्त यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करता येऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे...! मात्र या निकालाचा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. हे सरकार फक्त आश्वासन देत.. पूर्तता करत नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे निकाल वेगळे असतील.
शहादा नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आज नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली. पक्षाच्या वतीने एकूण 14 उमेदवारांनी अधिकृतपणे नामांकन अर्ज सादर केले असून नगराध्यक्ष पदासाठी मकसूद खाटीक हे पक्षाचे उमेदवार ठरले आहेत.
नामांकन सादर करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून झाली. ढोल-ताशांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण रंगतदार झाले होते. रॅलीत शहरातील अनेक समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आज आळंदी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत गोपाळपूर रोडवरील दुसऱ्या पत्रा शेड पर्यंत विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग जाऊन पोहोचली होती. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान पाच तासांचा कालावधी लागत होता. आज आळंदी येथे एकादशीनिमित्त मोठी कार्तिकी वारी भरत असते. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात देखील विठ्ठल दर्शनासाठी भक्तांनी हजेरी लावली आहे.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे भुसावळ मधून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात
भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत रजनी सावकारे यांनी दाखल केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज
मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असल्याने भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक संजय सावकारे यांच्यासाठी ठरणार प्रतिष्ठेची
Ancr - भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात असून रजनी सावकारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्याने भुसावळ नगर परिषदेची निवडणूक संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठित ठरणार आहे.
नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी मैदानात...
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जयवंत जाधव यांना उमेदवारी....
जयवंत जाधव यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी....
नवापूर नगरपरिषद 23 जागा लढवणार राष्ट्रवादी...
- निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार एका मनपा क्षेत्रात ओबासींच्या एका जागेचं नुकसान
- ज्या ठिकाणी शुण्य पूर्णांक ५० टक्के (०.५०) पेक्षा जास्त आरक्षण निघते, तिथे ओबीसीच्या एका जागेचं नुकसान
- ओबीसींच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास दूर्लक्षीत करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
- राष्ट्रीय ओबीसी महासंघ न्यायालयात जाणार, बबनराव तायवाडे यांची माहिती
- राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आज भेट घेणार
वाशिम जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या काळात शिंदे केलेला जय महाराष्ट्र करत कारंजा येथील युवा सेनेच्या वीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्याने ऐन पालिका निवडणुकीच्या काळात शिंदे सेनेला खिंडार पाडली आहे,यावेळी ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थिती या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानं कारंजा शहरात उबाठा गटाला काहीशी ताकत मिळाली.
नगर तालुक्यातील इसळक येथे 10 वर्षीय राजवीर कोतकरवर बिबट्याने हल्ला केल्याने गावाकऱ्यांनी केलें गाव बंद....
बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ इसळक, निबंळक आणि खारे कर्जूने हे तीन गाव कडकडीत बंद...
दोन दिवसापूर्वी इसळक पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खारे कर्जूने येथे एका पाच वर्षीय मुलीला बिबट्याने हल्ला करत केलें होतें ठार...
तर गावाकऱ्यांनी गाव बंद केलें असून थोड्या वेळात बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणार रास्ता रोको आंदोलन...
नगर तालुक्यात गेल्या तीन दिवसात दोन हल्ले आणि जिल्ह्यात दहा दिवसात चार हल्ले केल्याने गावकरी आक्रमक
भाजपमध्ये दिलीप माने यांच्या प्रवेशावरून आमदार सुभाष देशमुख आक्रमक...
भाजप आमदार सुभाष देशमुख यांची दिलीप माने यांच्यावर नाव न घेता टीका
“कोण पक्षात येतंय, कोण जातंय… मला माहिती नाही”
“आता नवीन लोकांना कुठे ठेवू?” कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये असा आमदार देशमुखांचा यांचा सूर...
“पक्षात येताच तिकीट मागणे चुकीचे, त्यागाची भावना ठेवावी.”
“आयत्या पिठावर रेघोट्या नकोत” नवीन येणाऱ्यांवर टीका.
“पक्ष नेतृत्व सर्वोच्च आहे, सांगितलं तर मी दुसऱ्या मतदारसंघातूनही लढेन.”
नवीन लोकांच्या वाढत्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त.
-
- आदिवासी समाजाची लोककलेचे दर्शन आदिवासी बांधवांकडून सादर करण्यात आला .
- राणी दुर्गावती , बाबुराव शेडमाके क्रांतीकारांचे देखावे यावेळी सादर करण्यात आले .
- जनजाती यात्रेत विदर्भातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आदिवासी समाजाच्या गौरव आणि त्यांची गाथा ही देशाला कळावी यासाठी नागपुरात तीन दिवस जनजाती गौरव दिवस मानकापूर परिसरात प्रदर्शनीच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना शिंदे गट युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकांचा मुलगा वैभव पाटील याच्यासह सात जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे सासवड रस्त्यावर पीएमपीएल बंद पडल्याने सासवड रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
आज सकाळी सासवड वरून पुण्याकडे निघालेली पीएमपीएल वडकी जवळील दहावा मैल या ठिकाणी बंद पडली बंद पडलेल्या बस मुळे फुरसुंगी पोलीस स्टेशनपासून वडकीपर्यंत वाहतूक कोंडी
याच ठिकाणी पालखी महामार्ग रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने त्यात वाहतूक कोंडीत भर पडली आहे
- मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका.
- मोहोळ नगर परिषदेची जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर दिली.
- मोहोळ मतदार संघाचा आमदार असतानाही निवडणुकीचे सूत्र मतदार संघाच्या पलीकडच्या खासदारांना दिले.
- विधानसभेच्या वेळेस त्यांनी इतर मतदारसंघात प्रचार केला पण मोहोळ येथे येऊन राजू खरे यांचा प्रचार केला नाही.
- मला लहानपणापासून माहिती की, मोहिते पाटील आणि राजन पाटील यांचे तीन पिढ्यांचे नातं, तीन पिढ्यांच्या नात्याला अंतर होऊ नये म्हणून राजू खरे यांच्या प्रचाराला ते आले नाहीत.
- त्यामुळे मोहिते पाटील मोहोळ नगरपरिषदेचे सूत्र कसे काय घेऊ शकतात, त्यांना कोणाला मदत करायची
- मोहोळचा नगरअध्यक्ष आणि वीस नगरसेवक तुतारीच्या चिन्हावर निवडून आले तर मोहिते पाटलांना त्याचे श्रेय जाईल आणि पराभव झाला तरी त्याचे श्रेय मोहिते पाटलांना जाईल.
- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मोहोळ ची जबाबदारी माझ्यावर दिली नाही.
- शरद पवार यांच्यासोबत माझी कैफियत मांडली, राजू खरे यांना पराभव करण्यासाठी रमेश कदम नी काम केलं त्याला घेऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील मीटिंग घेत आहेत.
- मोहिते पाटील यांनीच विजयाचे आणि पराभवाचे पण श्रेय घ्यावं.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औसा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सर्वात पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे औसा नगरपालिकेत निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे. दरम्यान अद्याप कुठल्याही घटक पक्षाची युती झाली नसली तरी, यावेळी मात्र,भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशीच लढत राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे आणि स्थानिक पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सौ परवीन शेख यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय,. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साह व्यक्त केला. पक्षाच्या ताकदीचा आणि तयारीचा संदेश असलेल्या असल्याचं जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी सांगितलं, तर निवडणूक प्रक्रिया सुरू होताच राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी केलेल्या या जलद हालचालीमुळे इतर पक्षांवर देखील अर्ज दाखल करण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. तर औसा नगराध्यक्षपदाच्या लढतीत आता रंगत वाढणार असून पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना देखील वेग येणार आहे.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीच नुकसान झाल आहे , दरम्यान अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "नाम फाउंडेश" या सामाजिक संस्थेनकडून दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील पेरणी सुरळीत व्हावी, यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
नाम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ज्वारी, हरभरा, या रब्बी पिकांसाठी आवश्यक बियाण्यांचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सांगलीत पार पडले शेतकरी-उत्पादक खरेदीदार संमेलन
सांगलीमध्ये कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकरी-उत्पादक खरेदीदार संमेलन पार पडले आहे.
जिल्ह्यात पिकणाऱ्या प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना-व्यापार पेठ मिळावी, या उद्देशाने संमेलनाचा आयोजन करण्यात आला होता.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडले.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांना परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नये, शेतमालावर प्रकिया करण्याकडे भर दिले पाहिजे,असं आवाहन शेतकरयांना केले.
या संमलेनादरम्यान बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते..
तसेच या संमेलनाच्या माध्यमातून 14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार देखील पार पडला.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित
दिव्यांगत्वाचे ओळखपत्र सादर न करणे भोवले
यवतमाळ सीईओंच्या कारवाईने उडाली खळबळ
पुणे -
पुण्याच्या भोरमधील पाले येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक ओढ्यात पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना
कन्स्ट्रक्शन साइटवर सिमेंट घेऊन जात असताना वीसगाव खोऱ्यातील पाले येथील महादेवाच्या मंदिराजवळील ओढ्यावरील चढ चढताना, ट्रकमधील वजनामुळं चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उतारावरून पाठीमागे घसरून रस्त्याच्या कडेला पलटी झाला..
चालक तसेच क्लिनरने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उड्या मारल्याने सुदैवाने ते यात बचावले.. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही..
मात्र यामध्ये ट्रकच मोठं नुकसान झालय.
पुणे -
पुणे -सासवड रस्त्यावर पीएमपीएल बंद पडली
सासवड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
आज सकाळी सासवडवरून पुण्याकडे निघालेली पीएमपीएल वडकीजवळील दहावा मैल या ठिकाणी बंद पडली
बंद पडलेल्या बसमुळे फुरसुंगी पोलीस स्टेशनपासून वडकीपर्यंत वाहतूक कोंडी
याच ठिकाणी पालखी महामार्ग रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने त्यात वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
पुणे -
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
नवले ब्रीज संदर्भात मुरलीधर मोहोळ 11 11 वाजता घेणार बैठक
PMC ,PMRDA आणि NHAI चे अधिकारी बैठकीला उपस्थितीत असणार
नवले पुलावर सातत्याने होत असलेल्या आपघातांवर कसा आळा घालता येईल यावर होणार बैठक
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मुरलीधर मोहोळांनी घटनास्थळी दिली होती भेट
त्यानंतर आज उपाययोजना बाबत मोहोळ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.
नाशिक -
- बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा
- नाशिकच्या महात्मानगर परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शंका
- काल सायंकाळच्या वेळी एक बिबट्या केला होता जेरबंद
- बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ८ जण जखमी झालेत
- शहरात बिबट्या शिरल्याने वनविभागाकडून खबरदारी
- नागरिकांना दिलासा देण्यासाठी वनविभागाचा परिसरात रात्रभर मुक्काम
पांढरकवडा पालिकेची निवडणूक होणार तिरंगी
यवतमाळच्या पांढरकवडा पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करत इनिंग सुरू केली
भाजप व शिंदेसेना हे अजूनही वेट अँड वरच्या भूमिकेत आहे,त्यामुळे आगामी पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे
नगरपरिषदेत यंदा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे.यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षात मोठी आहे त्यामुळे युती किंवा आघाडी होण्याची शक्यता फार कमी आहे.
नागपूर -
- आमदार संदीप जोशी राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी.
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून.या कार्यकारणीत विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आली.
- ऑलिम्पिक संघटनेत विदर्भाचे प्रतिनिधित्व नव्हते या निमित्ताने आमदार संदीप जोशी यांची निवड करण्यात आली.
- महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात अमुलाग्र बदल आणि दिशा देण्यासाठी ही कार्यकारणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
धाराशिव -
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रब्बी पेरणीसाठी मदत
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 577 कोटी 54 लाख 46 हजार रुपयांची मदत मंजूर केली
मागील काही दिवसांपासून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आत्तापर्यंत तीन लाख 42 हजार 75 शेतकऱ्यांच्या खात्यावर 315 कोटी 36 लाख 2 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे
हेक्टरी 10 हजार रुपये रक्कम तीन हेक्टरच्या मर्यादीत बाधीत क्षेत्रानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.
अजुनही 1 लाख 64 हजार 689 शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी असुन ईकेवायसी नसणे यासह इतर बाबींमुळे ही रक्कम जमा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.