खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे धुळ्याच्या पिंपळनेर येथे उमटले पडसाद
धुळ्याच्या पिंपळनेर येथे पत्रकार संघटनेच्या पत्रकार पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध व्यक्त
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांना शिवीगाळ केल्याबद्दल आणि धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी.
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील रेडे गावात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या रेडे गावातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले..उन्हाच्या प्रचंड तडाख्यानंतर पहिल्यांदाच रेडे गावाला पावसाने जोरदार झोडपले आहे.यामुळे ग्रामस्थ मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिकच्या मनमाड शहरात गेल्या महिनाभरा पेक्षा जास्त काळापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होणे,लाईन ट्रिप होणे,तर अनेक वेळा तासंतास वीज गायब राहने,यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व व्यावसायिक वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्परता तपासण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदानावर गुरुवारी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही तालीम पार पडली.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव यांच्या आदेशानुसार परिमंडळ 3 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी या सरावात सहभाग घेतला.
संशयित आरोपी निदा खानसह तौसिफ अत्तार, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर आता ३० तारखेला सुनावणी होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली. रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे तापमानात ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पेरण्यांची गती मंदावली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ सुमारे २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून मागील वर्षाच्या तुलनेत पेरा लक्षणीयरीत्या कमी आहे. पावसाने उसंत घेतल्याने जूनमधील तीन आठवडे कोरडे गेले. गेल्या दोन दिवसांत काही भागांत हलका पाऊस झाला असला तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यात सहा फुटीर खासदारांविरोधात ठाकरेसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत खासदारांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित खासदारांवर टीका करत जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
नाशिकच्या येवला शहरातील पाटोदा रोडवरील हरी ठाकूर यांच्या मक्याच्या साठवण शेडमध्ये विषारी कोब्रा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. साप दिसताच कर्मचाऱ्यांनी मालकाला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दिपक सोनवणे यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या सोनवणे यांनी प्लास्टिक ताडपत्रीखाली लपलेल्या कोब्राला शिताफीने पकडून बाटलीत जेरबंद केले. त्यानंतर सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात जोरदार पाऊस.
पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील बळीराजा सुखावला.
नांदेड जिल्ह्याला 27 तारखेपर्यंत देण्यात आला आहे येल्लो अलर्ट.
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण काय.
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची अजून प्रतीक्षा कायम.
पत्रकारांना मारहाण करण्याची धमकी दिल्याच्या वादावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "हे राज्य बदनाम होत आहे. महाराष्ट्र असा नव्हता," असे ते म्हणाले. दिना पाटील यांच्या वक्तव्याचा विरोध करताना राऊत यांनी पत्रकारांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच, "गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे. मी कधीच पत्रकारांना शिवीगाळ केलेली नाही. पत्रकारांना शिव्या गद्दारांनी दिल्या," असा दावा करत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
लास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला.
घुले कुटुंबीयांनी पोलिसांवर केला रोष व्यक्त पीआय उनवणे यांना बडतर्फ करण्याची केली मागणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गेल्यानंतर कोल्हापुरातील जिल्हा प्रमुखाचा राजीनामा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
यवतमाळच्या ढाणकी महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात ढाणकी शहरात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
यवतमाळच्या ढाणकी महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात ढाणकी शहरात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती.. या प्रकरणात नऊ आरोपी अटक करण्यात आले आहेत.. या घुले कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला माजी खासदार प्रीतम मुंडे टाकळी घुले यांच्या निवास्थानी दाखल झाल्या.. कुटुंबियाकडून घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी घेतली
अमरावतीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.. आज युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस मधील मोठ नेतृत्व समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात रवी रानाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.यासोबत काँग्रेसचे 100 आणि ठाकरे गटाचे 40 कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश घेतला
धरण क्षेत्रातील अपुरा पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कल्याणडोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांना पाणी वापराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा अल निनो आणि आयओडी यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा मुद्दा चांगलाच पेटला असून, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन करत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना फुले देऊन, घरपट्टी वाढ मागे घेण्याची मागणी केली.. यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पुष्प घेण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला
शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या पेढा व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा आणि संशयित पेढा जप्त करून नष्ट करण्यात आलाय
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर नवापुरात अधिकाऱ्यांचे छापे...
मिठाई दुकाने आणि खाद्य आस्थापनांची प्रशासनाकडून कसून पाहणी...
अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे नवापूरच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ...
नवापूर बसस्थानक परिसरासह विविध भागांतील मिठाई दुकानांची तपासणी...
खाद्यपदार्थांची गुणवत्ता,स्वच्छता आणि एक्स्पायरी डेटची बारकाईने पाहणी..
या आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधरू शकत नाही.या आधीच्या दोन गुन्ह्यांमधे हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे.
तो सुधारण्याच्या पलिकडे गेलाय. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील अस सरकारी वकिलांंचं म्हणणय.
आरोपीने कृत्य करताना अनेक जखमा दिल्या
आरोपी ला दोषी आहे असे वाटत नाही
हा गंभीर गुन्हा आहे
आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुधारू शकत नाही
आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध- कोर्ट
नसरापूर बलात्कार हत्या प्रकरण
आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर
निकाल सुनावणीला सुरुवात
अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरवात केली आहे.मृग नक्षत्र लागून तब्बल २२ दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते.पावसाअभावी पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या.मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल
पीडित चिमकुलीची आई आणि आजी निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात हजर
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी केली होती कुटुंबीयांनी मागणी
त्यामुळे आज कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मावळ तालुक्यातील पुरातन घोरावडेश्वर डोंगरावर पुन्हा एकदा वन्यजीवांचे मनमोहक दर्शन घडले आहे. सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या देहूरोड-विकासनगर येथील नागरिकांना अवघ्या १५ फुटांच्या अंतरावर हायना अर्थात तरस हा वन्यप्राणी दिसला. नागरिकांची चाहूल लागताच या वन्यप्राण्याने कोणतीही आक्रमकता न दाखवता शांतपणे जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले.
-सातारा शहराला मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरण वाढीव योजनेच्या जलवाहिनी कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी करून आढावा घेतला.
या धरणाची उंची वाढवून शहरात पाणी आणणारे जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.
खनिकर्म प्राधिकरणांतर्गत करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरीचा वापर करून प्रशासकीय मान्यतेचे आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निसर्ग आपल्या संकेतांमधून ऋतूंचे आगमन आधीच सांगत असतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा दूत म्हणजे मृग किडा. मान्सूनची चाहूल लागताच किंवा मृग नक्षत्र सुरू होताच हा लाल मखमली किडा जमिनीवर दिसू लागतो. त्यामुळे अनुभवी शेतकरी आता पेरणीची वेळ झाली, असा अंदाज बांधतात. महाराष्ट्रात हा किडा गोसावी, बिरबबोटी किंवा मृग किडा या नावांनी ओळखला जातो. मखमली लाल रंगाचा हा किडा केवळ पावसाचा संदेशवाहक नसून शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो.
महाराष्ट्रात गाजलेल्या रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या प्रमुख आरोपींपैकी एक दिल्ली येथील डॉक्टर रवींद्र पाल सिंग याने अखेर आपल्या वकिलांसह ब्रह्मपुरी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर रवींद्र पाल सिंग यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पावसाळी पर्यटन हंगामाची चाहूल लागताच आंबोली परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंतवाडी वनविभागाने विशेष ‘आंबोली दर्शन सफारी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जूनपासून या सफारीला प्रारंभ होणार असून पर्यटकांना आंबोलीतील विविध निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता येणार आहे.
वनविभागाच्या या उपक्रमांतर्गत पर्यटकांना आंबोली धबधबा, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी मंदिर आणि कावळेसाद पॉईंट या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. विशेष सफारी वाहनातून ही सहल आयोजित करण्यात येणार असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार पर्यटन अनुभवावर भर देण्यात आला आहे.
भाजप नेते, खासदार नारायण राणे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून दिवसभर विविध शासकीय, सामाजिक, कृषी तसेच जनसंपर्काच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने होणार आहे. येथे विविध कामाचा ते आढावा घेतील. त्यानंतर सकाळी संविधान हत्या दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन तसेच ‘आणीबाणीची ५१ वर्षे – विचारमंथन आणि व्याख्याने’ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत..
पावसाअभावी सह्याद्रीच्या कुशीत असलेली बहुतांश धरणे अजूनही कोरडीठाक असून, पुणे आणि आहिल्यानगर जिल्ह्यांवर पाणीबाणीचं मोठं संकट ओढावलं आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन धरणे अद्यापही तहानलेलीच आहेत. धरण क्षेत्रात तुरळक पाऊस पडत असला तरी, धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी जोरदार पावसाची नितांत गरज आहे. चासकमान जलाशयासारखी मोठी धरणे कोरडी पडल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. बळीराजासह संपूर्ण प्रशासनाचे डोळे आता दमदार पावसाकडे लागले आहेत
सावंतवाडी शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील तीन संशयित काश्मिरी नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुस्लिम वेश परिधान केलेले दोन पुरुष आणि एक युवती मदतीसाठी पैशाची मागणीसाठी ते भटवाडी परीसरात फिरत होते. मात्र त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने तात्काळ सावंतवाडी पोलिसांना याची माहीती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान नागरिकांनी अशा संशयित लोकांपासून सावध राहावे काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
पुढील तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
धरणसाखळी क्षेत्रात देखील आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या, त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिली आणि शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी चक्क भाजप आणि महायुती गोटात दाखल झाले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पॅनल झालेले असतानाही दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे. ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र, बँकेत पक्षीय राजकारण नसते, यात निवडणुकीचा आणि महायुती किंवा पक्षीय राजकारणाचा संबंध नसल्याचं दानवे सांगतायत. जिल्हा बँक निवडणुकीत आतार्यत ८ जण बिनविरोध संचालक झाले असून, १२ जागांसाठी निवडणूक होत आहे.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत कामकाज पूर्ण
आज येणार अंतिम निकाल
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला होता
राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिलाच खटला ठरणार
पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत ११०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, तसेच तांत्रिक पुरावे जोडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.