Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभेची तयारी सुरू

Maharashtra News Live Updates: आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी 27 जुलै 2024 आणि मुंबई पुण्यातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर वाचा एका क्लिकवर...

Satish Daud

Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभेची तयारी सुरू

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात ११३ विधानसभा मतदारसंघातील ४६- विधानसभा प्रभारी जाहीर ९३ विधानसभा निरिक्षक पदाच्या नियुक्त्या जाहीर झालीय.

 Paris Olympic : लक्ष्य सेनची बॅडमिंटनमध्ये शानदार सुरुवात

पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने एल गटातील पहिला सामना सलग 2 सेटमध्ये जिंकून शानदार सुरुवात केली आहे.

Kolhapur Flood : प्रस्तावित सातारा - बेंगलोर महामार्गामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापुरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. राधानगरी धरणातून जरी पाण्याचा विसर्ग होत असला तरी कर्नाटक राज्यातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणातून पुढे पाणी सोडलं जात आहे. कर्नाटक राज्यातील राज्यमंत्र्यांसोबत जिल्हा प्रशासन आणि संपर्कात आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला पडलेला भराव देखील पूर परिस्थितीला कारणीभूत आहे. प्रस्तावित सातारा - बेंगलोर महामार्गामुळे भविष्यात पूर परिस्थिती होणार नाही, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

Akola Accident: भरधाव कारने पोलीस उपनिरिक्षकाला उडवलं; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने उडवले. यात बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झालाय. उपनिरिक्षक मोरे हे बोरगाववरून मुर्तिजापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने त्याच्या कारला धडक दिली.

Shivneri Fort:  किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला

किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजाच्या वरील बाजुचा कडा खाली कोसळल्याने भातखळा तटबंदीचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीय. पुणे जिल्हाधिकारी यांच्या गडकिल्ल्यांवर ३१ जुलै पर्यत जमावबंदी लागू असताना पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहे. किल्ल्यावर कडा कोसळण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाने केले आहे.

Chandrakant Patil : विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनींही जरांगेंना समजवावं, चंद्रकांत पाटलांचं आवाहन 

शासन चूक काय होते,ते नंतरचा विषय आहे. पण पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही, एका वाक्यात उत्तर द्या? मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावं की नाही सांगा. विरोधकच जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र विरोधक सत्ताधारी यांनी मिळून जरांगे यांना समजवलं पाहिजे.

Paris Olympics Opening Ceremony : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या गोल्ड मेडलवर चीनची मोहर

फ्रान्सच्या पॅऱिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांची दिमाखात सुरुवात झाली आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं गोल्ड मेडल जिंकण्याचा मान चीनने पटकावला आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले असून खा. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. रात्री उशिरा महाराष्ट्राच्या महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार त्यासाठी अजित पवार दिल्लीत गेले आहेत.

Pune Railway Block : पुण्यात रेल्वेकडून मेगाब्लॉक; ४ दिवस २० पेक्षा अधिक गाड्या रद्द

पुण्यातील दौंड येथील कामामुळे चार दिवस रोज 20 पेक्षा अधिक गाड्या रद्द झाल्या आहेत. पुणे रेल्वे विभागातील दौंड गुडस यार्ड आणि दौंड कार्ड लाईन येथील इंटरलॉकिंग कामासाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसाला 20 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत.

NEET UG Result 2024 : नागपुरातील सुभान सेनगुप्तता नीटमध्ये देशातून पहिला

नीटमधील परीक्षेच्या गोंधळानंतर नागपुरातील सुभान गुप्ता देशातून पहिला आला आहे. 4 जूनचा निकाल आल्यावर तो देशातून पहिला होताच. पण त्यानंतर आता पुनर्निकालामध्ये सुभान पहिल्याच आला आहे. सुभान सेनगुप्ता याने 720 पैकी 720 गुण मिळवले आहे.

Uddhav Thackeray Birthday:  राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना फोन करून दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray Birthday: 'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', पदाधिकाऱ्यांचे चक्क " सैलानी बाबांकडे " साकडं

आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन त्यानिमित्त बुलढाण्यातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाण्यातील प्रसिद्ध अशा सैलानी दर्ग्यावर जाऊन चादर चढवली . उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होवोत , त्यांना दीर्घायुष्य लाभाव यासाठी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी सैलानी दर्ग्यावर जाऊन सैलानी बाबांना मन्नत देखील मागितली. पुरोगामी विचारांच्या ठाकरे परिवारातील सदस्याच्या प्रगतीसाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दर्ग्यावर चादर चढवून मंन्नत मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

Sudhir Mungantiwar On Sharad Pawar: 'पंतप्रधान पदाचे स्वप्न तडीपार', भाजप नेत्याची शरद पवारांवर टीका

पंतप्रधान बनणार हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने मदत न केल्याने ते स्वप्न तडीपार झाले. पंतप्रधान दूरच गृहमंत्री होऊ शकले नाही. केवळ सात जागांच्या भरोशावर कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत नेते होण्याचं स्वप्न पाहतात अशा शब्दात शरद पवार यांच्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली.

Badlapur Breaking News: मांजर्ली भागात गॅस पाईपलाईन फुटली

बदलापूर मधील मांजर्ली भागात गॅस पाईपलाईन फुटली. शाश्वत पार्क जवळील ही घटना असू जेसीबीचा धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली. याठिकाणी महानगर गॅस कंपनीचे गॅस गळतीवर नियंत्रण आणले आणले असून गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तोपर्यंत परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Niti Ayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य, ममता बॅनर्जी संतापल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या. बैठकीत बोलू दिले नाही तसेच माईक बंद केल्याचे सांगत बैठक अर्धवट सोडून ममता बॅनर्जी निघाल्या. बाकी मुख्यमंत्री यांना 20 मिनिट बोलू दिलं, माझा माईक 5 मिनिटांनी बंद केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

OBC Protest: ओबीसी समाज आक्रमक, नांदेडमध्ये रास्ता रोको

मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मागणीसाठी नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.नांदेड ते नागपूर महार्गावर ओबीसी समाजाने रस्तारोको आंदोलन केले.हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे हे आंदोलन करण्यात आले.तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता. हदगाव तालुक्यातील कवणा या गावी दत्तात्रय आनंतवार यांनी याच मागणी साठी मागील सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पण या आंदोलनाची शासनाणे दखल घेतली नाही.परिणामी ओबीसी समाजाणे आक्रमक भूमिका घेत रस्त्यावरून रास्ता रोको आंदोलन केले

BJP Meeting Delhi: दिल्लीत भाजप मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक

भाजप भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. दुपारी 4 वाजता भाजप मुख्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीत त्या त्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Ahmednagar Accident: उड्डाण पुलावरुन टेम्पो कोसळला, एकाचा मृत्यू 

अहमदनगरच्या उड्डाण पुलावरील वळणावरून नुकताच एक टेम्पो खाली पडून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून वारंवार अशा घटना घडत आहे. त्यामुळे हा उड्डाण पुलावरील वळण धोक्याची ठरत आहे. या घटनास्थळाला खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पुलावरील कठडे वाढवण्यासाठी सांगितले असून तसेच डांबराचा एक लेयर देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. तर या संदर्भात संबंधित विभागाची लवकरच बैठक घेणार असल्याचं खासदार लंके यांनी सांगितला आहे.

Pandharpur Rain: पंढरपुरातील ब्रिटिश कालीन दगडी पूल पाण्याखाली

वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात पोचले आहे. त्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपूर येथील ब्रिटिश कालीन जूना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने पूलावरील वाहतूक बंद केली आहे. दरम्यान भीमा नदीवरील आठ बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या लोकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या वीर धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

Belapur News: बेलापूर दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांना  तातडीने  मदत करावी: CM शिंदे

शहाबाज गाव, सेक्टर १९ बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना दिली.

Jalgaon Accident: ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात; वृद्धाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खडका चौफुली लगत टँकरचे टायर फुटून टँकरचा अपघात झाला असून टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने 62 वर्ष वृद्धाला धडक देत टँकर महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानावर धडकला असून या अपघातात 62 वर्षे वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे . तर भंगार दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.

Navi Mumbai Building Collapse: बेलापूर इमारत दुर्घटना: आमदार मंदा म्हात्रेंकडून घटनास्थळाची पाहणी

बेलापूर इमारत दुर्घटना प्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली घटनास्थळाची पाहणी केली. सदर इमारत धोकादायक होती, मनपातर्फे नोटीस देण्यात आली होती तरी ती खाली झाली नव्हती. नवी मुंबईतील धोकादायक इमारतीवर योग्य उपाययोजना कराव्यात. नवी मुंबईतील सर्व अनधिकृत इमारतींची चौकशी करण्याची मागणी करणार असे म्हणत आमदार मंदा म्हात्रे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Belapur Building Collapse: नवी मुंबईतील शहाबाज गाव इमारत दुर्घटना; 2 जण अडकल्याची प्राथमिक माहिती

नवी मुंबईतील शहाबाज गाव इमारत दुर्घटना.

इमारतीच्या मलब्या खाली 2 जण अडकल्याची प्राथमिक माहिती.

इमारतीच्या मलब्या खालून एका इसमाचा मृतदेह काढला बाहेर.

मलब्या खाली आणखी एक जण असण्याची शक्यता.

Pune Police News: पुण्यातील पोलीस अधिकारी बेपत्ता; शोध सुरू

पुणे शहर पोलीस दलातील लोणिकंद पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी हरवल्याची कुटुंबियांकडून तक्रार दिल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. राहुल खंडू कोळपे असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोणीकंद पोलीस स्टेश मध्ये कार्यरत आहेत. मला पुढील काही काळासाठी कोणीही कॉल अथवा मेसेज करू नये अशा मेसेज स्टेटसला ठेवून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

Amravati Fire News: अमरावतीत इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात ठाकरे इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

CM Eknath Shinde On Kolhapur Flood: कोल्हापूरातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा', CM शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच निवारा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा असे आदेशही त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

IAS Pooja Khedkar News: पूजा खेडकर यांच्याशी संबधित कंपनीचा लिलाव

पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवल्यामुळी कंपनी कर संकलन विभागाकडून सिल करण्यात आली होती. आता मात्र थकित कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावत काढली जाणार असून लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरवात केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

Nagpur Rain News: नागपुरात पावसाच्या सरी

नागपूरत सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी सुरू आहेत. शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असून आज हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. नागपूर अमरावती, वर्धा चंद्रपूर भंडाऱ्यात मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज वर्तवला आहे तर गोंदिया अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ, तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे.

Akola News: उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडल्याने तणाव, ठाकरे गटाकडून निषेध

अकोल्यात उद्धव ठाकरेंच्या वाढ़दिवसाचे लावण्यात आलेले बॅनर फाड़ले आहे. अकोला शहरातल्या पोस्ट ऑफिस चौकात लावण्यात आलेल्या उद्धव ठाकरेंचे वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तिकडून फाड़ले आहे. या प्रकाराचा ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर रास्ता रोको करून निषेध व्यक्त केलाय आणि नारेबाजी केली आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस देखील घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते..

 Pune News: घरगुती सिलेंडरचा भडका, मोठी दुर्घटना टळली

पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात, घरगुती गॅस सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना. गावातील निगडे कुटुंबातील महिलेने स्वयंपाक करण्यासाठी गॅस शेगडी पेटवल्यानंतर, ही आग सिलेंडरच्या रेग्युलेटर पर्यंत येऊन अचानक आगीचा मोठा भडका उडाला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ निगडे यांच्या घराकडे धाव घेत घरातील महिलांना घराच्या बाहेर काढून, सिलेंडरवर कापड टाकून आग विजवली. सुदैवाने यात गॅस सिलेंडरचा स्फ़ोट न झाल्यानं मोठी दुर्घटना टळली, ग्रामस्थांनी तत्परता दाखवून सिलेंडरची आग वेळीच विजवल्यान अनर्थ टळला..

Pune News: पुणे शहरातील 10 अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल

पुणे शहरातील 10 अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील जवळपास 49 शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर

शिक्षण विभागातून अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या, 10 शाळांवर फौजदारी गुन्हे करण्यात आले दाखल

पुणे जिल्ह्यातील अनेक शाळा नियमबाह्य करत होत्या काम

या सर्व शळांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा.

Mahayuti Meeting Delhi: अजित पवार आज  दिल्लीत; अमित शहांसोबत बैठक

आज राष्ट्रवादीचे नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित असतील. बैठकीमध्ये प्रामुख्याने केंद्रीय कॅबिनेट विस्तार, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप हे प्रमुख मुद्दे असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 80 जागा मिळाव्यात अशी प्रामुख्याने मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 65 ते 70 जागा येतील, असंही सांगण्यात येत आहे.

Beed News: परळी मतदार संघातील मराठा आंदोलक ॲड माधव जाधव यांचा आज शरद पवार गटात प्रवेश..

बीडच्या परळी मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असणारे, प्रसिद्ध विधीज्ञ तथा मराठा आंदोलक ॲड.माधव जाधव हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज ते शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन बीड येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आधी मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष, नंतर भारत राष्ट्र समितीचे विधानसभा प्रमुख असा जाधव यांचा प्रवास राहिलेला आहे. मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख आहे. दरम्यान मराठा चेहरा तथा विधीतज्ञ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

Jalgaon News: जळगावमध्ये शरद पवार गटाकडून निदर्शने

धरणगाव शहरात नळांना येणारे पाणी खूपच गढूळ आणि दूषित स्वरूपाचे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाईपलाईनच्या कामांमुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. पथदिवे बंद पडले असून, गटारी सुद्धा तुंबल्या आहेत. यासह अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Kolhapur Flood: शिरोळ तालुक्याला पुराचा धोका; नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेले आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेले असून शिरोळ तालुक्याला पुराचा धोका असल्याने तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तसेच कोल्हापूर - राधानगरी राज्यमार्ग, कसबा बावडा ते शिये मार्ग बंद झाला आहे. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील तीन रस्त्यांवर पाणी आले असून सीपीआर चौक ते महावीर कॉलेज रोडवर पाणी आले आहे.

Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपत्रता प्रकरणी दिलेल्या निकालावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. 30 जुलैला होणारी सुनावणी आता 3 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. मागच्या 8 महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे ही याचिका.

Sharad Pawar Press Conference: शरद पवारांची दुपारी पत्रकार परिषद; मराठा आरक्षणावर काय  बोलणार?

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर शरद पवार काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तर राज्यातील घडामोडी वरही शरद पवार भाष्य करण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेनंतर दुपारी 2 वाजता बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये मराठा मावळा संघटनेच्या वतीने आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी

ज्येष्ठ नेते शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ते शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले आहेत. दरम्यान, या हॉटेलमध्ये अचानक मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घुसले. यावेळीआरक्षणासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला.

 Pune-Nashik highway : पुणे-नाशिक महामार्गावर रिक्षाचा भीषण अपघात

पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अंदाज न आल्याने रिक्षा पलटी झाली. थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रिक्षाचालक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Sangli News : कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी; नदीकाठाच्या गावांना मोठा दिलासा

सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढत आहे. तासाला फुटाने वाढणारी पातळी आता तासाला इंचाने वाढत असून गेल्या 12 तासात कृष्णेच्या पाणी पातळीत केवळ 7 इंचाने वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी 39.7 फूट इतकी झाली आहे. इशारा पातळी ही 40 फूट आहे. यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा काहीसा जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे. मात्र, कृष्णा नदी इशारा पातळीजवळ पोचल्याने आतापर्यंत सांगली शहरातील 359 कुटुंबातील 1 हजार 459 व्यक्तींचे तसेच 150 जनावरांचे आतापर्यंत स्थलांतर झाले आहे.

Vijay Wadettiwar News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आहे. रक्ताचा नमुने तपासणीत विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलंय. मुंबईवरून नागपूर येथे परतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी वडेट्टीवार यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी सर्व दौरे रद्द केले होते. त्यांनाखाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Parbhani News : अंगणवाडीच्या छताला गळती, बालकांचा जीव टांगणीला

पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे अंगणवाडीच्या छताला गळती परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोनखेड येथे अंगणवाडी इमारत बांधण्यात आली होती. मात्र, इमारतीचे बांधकाम निकृष्ट व बोगस दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात मात्र छताला गळती लागली. यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाद त्रास सहन करावा लागला.

अंगणवाडीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पाण्याचा सामना करावा लागत आहे. एकीकडे राज्य शासन लाखो रुपयांचा निधी देऊन देखील काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याचा आरोप सोनखेड येथील ग्रामस्थांनी केला आहे. सदरील इमारतीचे सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Jayakwadi dam water storage : जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. नगर, नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतेय. सध्या ९ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा साडेपाच टक्क्यांवर पोहचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT