Aaditya Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray News: अजित पवारांच्या शपथविधीनंतर आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला खोचक सवाल

Aaditya Thackeray On Shinde Group: मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवसेनेच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही.

Chandrakant Jagtap

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत प्रवेश केला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवसेनेच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही.

हाच धागा पकडून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटाला काही प्रश्न विचारले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, 'आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न.

आदित्य ठाकरेंचा पहिला प्रश्न, 'मंत्रिमंडळ विस्तार झाला, आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?' (Breaking News)

दुसरा प्रश्न, 'रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?'

तिसरा प्रश्न, 'एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? (Latest Political News)

चौथा प्रश्न, सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना...

शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले, 'एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी' अशी ही लढाई असणार आहे!' (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT