Parbhani Crime चेतन व्यास -
महाराष्ट्र

धक्कादायक! दारूतून विषप्रयोग करून साडूचा घेतला जीव; भयंकर कारण आलं समोर

आरोपीने दारुची बाटली विकत घेतली आणि ती मृत मोरेश्वर याच्या घरासमोर फेकून दिली आणि त्याला दारू बाहेर ठेवली असल्याच सांगितलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास -

वर्धा : जमीन, संपत्तीच्या हव्यासापोटी माणूस कोणत्याही थराला जातो, प्रसंगी कोणाचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहात नाही. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील (Selu) जुनगड येथील पिंपळेमठ येथून समोर आली आहे.

सासरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादामुळे एकाने आपल्याच साडूची हत्या केली आहे. मोरेश्वर मारोतराव पिंपळे (३४) रा. जुनगड असे मृतकाचे नाव आहे. तर मुख्य आरोपीचे नाव संदीप रामदेव पिंपळे असं आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संदीप पिंपळे यांने आपल्या साडूशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी थंड डोक्याने कट रचला, त्यानुसार आरोपीने सिनेमातील क्राईम कथानकाला लाजवेल असा खूनाचा कट रचला. सहा महिन्यापासून तो हत्येच्या प्रयत्नात असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

आरोपीने दारुची बाटली विकत घेतली आणि ती मृत मोरेश्वर याच्या घरासमोर फेकून दिली आणि त्याला दारू बाहेर ठेवली असल्याच सांगितलं. त्यानंतर मोरेश्वरने यांनी रात्रीचं जेवण केल्यानंतर आरोपीने टाकलेल्या बाटलीमधील दारु स्वतःच्या घरात प्यायला. मात्र, काही मिनिटांमध्ये तो जमिनीवर कोसळला अन् त्याची दातखिळी बसली. घरातील सदस्यांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती.

मात्र, सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा करत असताना त्यांना हा आकस्मित मृत्यू नसून ही हत्या असल्याचा संशय आला. पंचनामा करताना त्या ठिकाणी पडलेली दारुची बाटली अन् त्या बाटलीतून येणारा उग्र वास तसंच झाकणावरील बारीक छिद्रांमुळे घातपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून तपासाला सुरवात केली. दरम्यान मुख्य आरोपी असलेला साडू संदीप पिंपळे याला विचारपूस करत पोलिसी हिसका दाखवताच त्याने हत्या केल्याचे कबूल केले.

पाहा व्हिडीओ -

आरोपीने सासऱ्याच्या ५ एकर सामाईक शेतीच्या हिस्सेवाटणी दरम्यान झालेल्या वादाचा राग असल्याने त्याने दारुत विषप्रयोग करुन मोरेश्वरला ठार मारल्याची कबूली पोलिसांना दिली. आरोपी संदीप हा कमी शिकलेला आहे. मात्र, त्याने थंड डोक्याने केलेल्या निष्ठूर हत्येने पोलिसही आवाक झाले आहेत.

दरम्यान, मोरेश्वरचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी संदीप हा त्याच्या नातलगांना भेटण्यासाठी गेला. स्मशानात अंत्यसंस्काराला देखील गेला. मुख्य आरोपीला अटक केल्यावर त्याने विष हे जडीबुटी विकणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी विजयसिंह चितोडीया आणि राजकुमार चितोडीया या दोघांना अटक केली आहे. दोघे जडीबुटी विक्रीचा व्यवसाय आहे.

संदीप पिंपळे याच्या कुटुंबियातील सदस्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्याने यापूर्वी यांच्याकडून काही औषधी घेतल्या होत्या. तेव्हापासून संदीप यांच्या संपर्कात होता. यातून त्यांची ओळख वाढली आणि मोरेश्वरला मारण्याच कटात यांनी विष उपलब्ध करून देत मदत केली. या घटनेत कोणत्या प्रकारचे विष वापरण्यात आले याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जप्त केलेली बॉटल प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

SCROLL FOR NEXT