Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: धक्कादायक! व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णास अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

एचआयव्हीबाधित महिलेकडून रुग्णांचे लैंगिक शोषनाचे गंभिर आरोप

विनोद जिरे

Beed News: बीडच्या अंबाजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर जिल्हा आरोग्य यंत्रणेने धाड टाकल्यानंतर, नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत..याच व्यसनमुक्ती केंद्रातील एक कथित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. यात 5 जणांनी हात-पाय धरून, एका रुग्णाला काठीने अमानुष मारहान करणारा हा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर काटा येईल. (Latest Marathi News)

यामध्ये 5 लोक एका व्यक्तीला पकडतात तर एक जण काठीने पार्श्वभागावर जोरात मारत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार केंद्रातील इतर रुग्ण पाहत असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडिओ (Video Viral) जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देत मारहाण करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेनी केली आहे. तसेच व्यसनमुक्ती केंद्रात छळ छावणी कशा पद्धतीने सुरू होती हे समोर येत आहे.

या व्यसनमुक्ती केंद्रात त्रास देणाऱ्या, ओरडणाच्या लोकांना झोपेच्या गोळ्या दिल्या जात होत्या. त्यांच्यासोबत नंतर अश्लील चाळेही केले जात होते, असे समजते. तर एका तक्रारीत एचआयव्हीबाधित महिला या रुग्णांना उत्तेजित करत होती, असेही म्हटले आहे.(Beed News)

एचआयव्ही बाधीत कर्मचारी महिला "मी असताना तुम्हाला बायकोची गरज काय ? तुम्ही इथेच माझ्यापाशी रहा" असे म्हणून एचआयव्ही बाधित महिला कर्मचारी उपचार घेणाऱ्या लोकांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. तसे न केल्यास इतर लोकांकडून त्यांना मार दिला जात होता. असं पीडित व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत आपबिती सांगितली आहे.

या अगोदर अंबाजोगाई (Ambajogai) येथील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात एका महिला डॉक्टरकडे (Doctor) शरीरसुखाची मागणी केल्या प्रकरणी एका डॉक्टरविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच आरोग्य विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये मुदत बाह्य औषधी, अस्वच्छता आणि झोपेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. तसेच औषधाचा तपशील देखील उपलब्ध नाही त्यावरून आरोग्य विभाग कारवाई करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT