Rare Case of Baby Inside Baby saam tv
महाराष्ट्र

Buldhana news : गरोदर महिलेच्या पोटात बाळ, त्या बाळाच्याही पोटात दुसरं बाळ; महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ घटना

Rare Case of Baby Inside Baby : बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ठिकाण जिल्हा महिला रुग्णालय बुलढाणा...वेळ साधारपणे दुपारची..! एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली.... ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती होती... डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.... सोनोग्राफी गेल्यानंतर डॉक्टरांनी धक्काच बसला.... सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरं बाळ आहे...हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल पण हे असं घडलंय.

बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचं समोर येतं. याला वैद्यकीय भाषेत 'फिटस इन फिटो'असं म्हटलं जातं.

नेमकी काय आहे घटना?

रूग्णालयात आलेल्या या महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला "फिटस इन फिटो" असं वैद्यकीय भाषेत म्हटले जातं. हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आलीये.

काय आहे ही नेमकी दुर्मिळ घटना?

  • गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला "फिटस इन फेटो" असं म्हणतात.

  • काँनजेनाईटल एबनॉर्मलिटीमुळे ही घटना घडण्याची शक्यता आहे.

  • जवळपास ५ लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक , तर २० लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते.

  • अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतलं जातं.

यासंदर्भात स्त्रिरोगतज्ज्ञ आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी माहिती दिलीये. डॉ. राजपूत यांनी सांगितलं की, हे फार दुर्मिळ प्रकरण मानलं जातं. सोनेग्राफीच्या माध्यमातून गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचं निदान केलं जाऊ शकतं. याचं नेमकं कारण काय असू शकतं हे ठोसपणे सांगू शकतं नाही.

बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्याने या महिलेला छत्रपती संभाजी नगरच्या सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ अशी ही वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ घटना समोर आल्याने बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT