Sexual abuse of a minor girl Saam TV
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीसोबत आधी लग्न जमलं, नंतर मोडलं...; तरुणाने लॉजवर नेऊन केले अत्याचार

विनोद जिरे

Beed Crime News: बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexual Abuse) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणाने मुलीवर अत्याचार केले होते, तो तरुण आपल्या परिवारासह मुलीच्या घरी तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आला होता. मात्र, त्यांच लग्न मोडलं होतं. (Sexual abuse of a minor girl)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला लग्नासाठी स्थळ आले होते. मुलीची पसंतीही झाली, पण हुंडा देण्या-घेण्यावरून हे लग्न मोडले. मात्र, लग्न मोडल्यावरही तरुणाने मुलीचा पिच्छा सोडला नाही. ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी बीडमध्ये (Beed) एका शासकीय वसतीगृहात राहते. ती 16 वर्षांची आहे.

आरोपी तरुणाने या अल्पवयीन मुलीला वारंवार लग्नाचे आमिष दाखवले. एके दिवशी हा तरुण या मुलीच्या वसतिगृहाजवळ आला आणि तिला फूस लावत आपल्या दुचाकीवरून बाहेर नेले. यावेळी त्याने मुलीला चक्क लॉजवर नेले तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लॉजवर दोनवेळा त्याने अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म केले.

तिसऱ्यांदा त्याने या अल्पवयीन मुलीला गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एका शेतात नेले आणि बळजबरी केली. मुलीने आधी लग्न करू असे सांगितल्यावर त्याने तिला शिवीगाळ करत तिला एकटीला सोडून दुचाकीवरून पलायन केले. दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सचिन सुभाष राठोड रा. टाकरवण, ता. माजलगाव याच्यावर बीड शहरातील पेठ बीड ठाण्यात, बलात्कार, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT