Bachchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu News: बच्चू कडूंना मोठा दिलासा; तात्पुरता जामीन मंजूर, नेमकं प्रकरण काय?

बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News:  २०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी आता बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

2017 साली नाशिक (Nashik) महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांना बाजूला केले होते. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT