Baramati News Saam TV
महाराष्ट्र

Baramati News : उजनीच्या पाण्यात हिरव्या रंगाचे विष? नागरिकांसह पशुधनाचे आरोग्य धोक्यात...

उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलून पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचं शैवाल तसेच केमिकल मिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Baramati News : पुणे जिल्ह्यासह सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचं शैवाल तसेच केमिकल मिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याला हिरवा रंग आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेती पिकाची उत्पादकता देखील घटली आहे. मनुष्यासह पशुधन धोक्यात आले आहे. (Latest Ujari Dharan News)

या पाण्यावर अनेक संशोधने झाली, यात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचं या संशोधनातून पुढे आलं, पण उजनीच्या पाण्यावरती शासनाने काहीच उपायोजना न केल्याने आता उजनी धरणाचे पाणी दुर्गंधीयुक्त आणि या पाण्याचा रंग चक्क हिरवा बनत चाललेला आहे. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील गावात या पाण्याचा दुर्गंधी युक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी इतके दुशीत झाले आहे की, त्याचा इतर कामांसाठी देखील वापर होऊ शकत नाही. अनेक नागरिक हे पाणी विषारी झाल्याचे म्हणत आहेत.

उजनी धरणाच्या शेजारी अनेक कंपन्या उभ्या आहेत. राजकीय नेत्यांनी विकासाच्या नावाखाली या कंपन्या इथे उभारल्यात. यातील खराब पाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ थेट पाण्यात सोडले जात आहेत. आता पर्यंत हे पाणी शुद्ध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. मात्र कंपन्या शासकीय यंत्रणेला हाताशी धरून पाणी शुद्ध करण्याऐवजी ते साठवून ठेवत आहेत. पावसाच्या दिवसांत हे पाणी नाल्यात सोडले जात आहे. असे निदर्शनास आल्याचे स्थानीक नागरिकांचे म्हणणे आहे.

हा सर्व भोंगळ कारभार उजनीला आलेल्या हिरव्या तवंगामुळे समोर आला आहे. उजनीमध्ये किनाऱ्यापासून अगदी मध्य भागापर्यंत हिरव्या गडद रंगाचे शेवाळ दिसत आहे. हा रंग अगदी ऑइल पेंट प्रमाणे भासत आहे. यामुळे पाण्यातील अनेक वनस्पती नष्ट झाल्या आहेत. तसेच पाण्यातले अनेक मासे याने नष्ट होत आहेत. याने पुणे, पिंपरी-चिंचवड, नगर, लातूर अशा भागांना याचा फटका बसत आहे. दुशीत पाण्याने शेतीवर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधीत कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT