Shivajinagar Police Station, Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime News: लग्नाचे अमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणीवर 6 वर्ष अत्याचार; गुन्हा दाखल

बीड शहरातील धक्कादायक घटना...

विनोद जिरे

Beed Crime News Today: प्रेमाचं नाटक करत लग्नाचे अमिष दाखवून, कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सतत 6 वर्ष अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुसऱ्या मुलीशी संसार थाटणाऱ्या गणेश या तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याविषयी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, पीडितेने एलएलबी शिक्षणासाठी 2017 ला विद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. यावेळी आरोपी गणेश हा एलएलबी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.

त्यानंतर काही दिवसांनी त्याने, पीडितेच्या मैत्रीणीच्या फोनवर फोन करुन पीडितेला फोन द्यायला सांगितला. यावेळी 'मला तू खूप आवडतेस, माझ्यासोबत मैत्री करणार का' असं म्हणाला. त्यावर पीडिता प्रेम करण्यापेक्षा माझ्यासोबत लग्न कर असं म्हणाली. त्यावर त्याने फोन कट केला. (Beed Crime)

त्यानंतर काही दिवस आरोपीने फोन केला नाही. मग, परत मॅसेज करण्यास सुरुवात केली. माझे तुझ्यावर प्रेम असून लग्न करण्यासाठी काही अडचण आहे. माझे आणि तुझे शिक्षण झाल्यावर आपण लग्न करु, असे म्हणाला.

त्यानंतर विविध ठिकाणी फिरायला नेवून वारंवार लग्नाचे अमिष दाखवून आरोपी गणेशने पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच बीड (Beed) शहरात एका ठिकाणी किरायची रुम करुन पीडितेला तिथे ठेवून तिथेही शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर पीडितेला तो एका मुलीसोबत विवाह करत असल्याची माहिती मिळाली. तसेच स्टेट्सला साखरपुड्याचे फोटो दिसले. त्यानंतर त्या मुलीसोबत विवाहही केला आणि पीडितेला तुला काय करायचे ते कर, तुझी आमची कास्ट वेगळी आहे.

मी लग्न करु शकत नाही, कुठे तक्रार द्यायची तिथे दे, माझं कुणीही वाकडं करु शकत नाही, अशी धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरुन गणेश याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांखाली खूप डार्क सर्कल्स झालेत? मग, हा घरगुती उपाय कायमचे डार्क सर्कल्स करतील कमी

Maharashtra Live News Update : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक ,आरपीआय आठवले गटाची तीव्र नाराजी

French Fries Recipe : शाळेतून आल्यावर मुलांसाठी बनवा कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

Face Care: तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्स फोडायची सवय आहे? मग, होऊ शकतात 'हे' परिणाम

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला २३ वर्षांनंतर बनतोय एकादशीचा संयोग; जाणून घ्या पुजेचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT