नाशिकच्या सिडको परिसरात हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या ६ वर्षीय मुलीने खेळताना एक रुपयाचं नाणं गिळलं. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. कारण मुलीच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने हे कुटुंबीय चिंतेत आहेत.
नाणं पोटात असल्याने मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे. सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रावण अलगाट या कामगाराची ही सहा वर्षांची मुलगी आहे. दिव्या असे या मुलीचे नावं आहे. ६ वर्षांची दिव्या आई पाणी भरत असताना खेळत होती. याच दरम्यान दिव्याने अचानक एक रुपयाचं नाणं गिळला.
त्यानंतर काही वेळाने तिला उलट्या सुरू झाल्या. आईने विचारपूस केल्यावर तिने नाणं गिळल्याचे सांगितले. त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. वडील कामावर असल्याने शेजाऱ्यांनी मदत करत तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. एक्सेरेमध्ये तिच्या पोटात नाणं असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र तिच्या पोटातील नाणं काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे कुटुंबीयांकडे नाही. या कुटुंबासाठी उपचारासाठी लागणारे पैसे नसल्याने अखेर निराश होऊन कुटुंबीयांना तिला घरी आणावे लागले. सध्या घरगुती उपचार सुरू असले, तरी तिची प्रकृती चिंताजनक असून तिचे कुटुंबीय उपचारासाठी पैशांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करत असून आर्थिक मदतीसाठी विनवणी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.