"नोकरीवर घ्या नाही तर"...! Aurangabad: जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल Saam Tv
महाराष्ट्र

"नोकरीवर घ्या नाही तर"...! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबादः पार्ट टाइम कर्मचारी असल्याचे बनावट कागदपत्रे (Documents) तयार करून कोतवाल म्हणून कामावर घ्या, अन्यथा आत्महत्या (self-slaughter) करतो, अशी धमकी औरंगाबादच्या (Aurangabad) जिल्हाधिकाऱ्यांना (Collector Sunil Chavan) देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअपवर (whatsapp) त्याने ही धमकी (Threat) दिली होती. याविरोधामध्ये सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रामभाऊ साबळे (Prashant Sable) असे या संशयिताचे नाव आहे. २०१३ पासून आजपर्यंत सेवेत येणाऱ्या सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्याने असे प्रकार केल्याच उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिले आहे. (A case been registered against person who threatened Aurangabad District Collector)

हे देखील पहा-

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. यानुसार, प्रशांत याने जिल्हाधिकाऱ्यांना ‘मी पदवीधर पार्ट टाइम कर्मचारी असून १९९९ सालापासून काम करत असल्यामुळे शासकीय सेवेत सामावून घेऊन कोतवाल पदावर नियुक्ती द्यावी, असे निवदेन देण्यात आले होते. यावर आजवरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुनावणी घेऊन शासकीय सेवेत थेट पद्धतीने नियुक्ती मिळण्यास पात्र ठरत नसल्यामुळे त्याचे सर्वच अर्ज निकाली काढले होते. त्यानंतर देखील प्रशांत साबळे यांनी सारखेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना समक्ष भेटून तसेच मोबाइल वर संदेश पाठवून आपण विष प्राशन करून किंवा आत्मदहन करून आत्महत्या करत असल्याची धमकी दिली होती.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संशयिता विरोधामध्ये जुनी माहिती मागवली होती. तेव्हा साबळेने तत्कालीन नायब तहसीलदार मीना यांची बनावट सही करून २९ ऑगस्ट २०१७ दिवशी औरंगाबाद तहसीलदार यांचा बनावट आणि खोटा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला होता. तसेच तो तहसीलदार मीना वराडे कार्यालयाच्या आवक जावक विभागामध्ये खतविल्याचे समोर आले आहे. तसेच रामभाऊ साबळे याने तहसील कार्यालयात पार्ट टाइम कर्मचारी म्हणून कामकाज केले असल्याचे उघड झाले आहे. मला २ दिवसात काही झाले तर आपण जबाबदार असणार आहे ,असा संदेश पाठवून त्याने आत्महत्येची धमकी दिली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT