"साप म्हणून दोरी आपटायचं काम भाजपनं करू नये"- महापौर

मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावर भाजपकडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम
"साप म्हणून दोरी आपटायचं काम भाजपनं करू नये"- Kishori Pednekar
"साप म्हणून दोरी आपटायचं काम भाजपनं करू नये"- Kishori PednekarSaam Tv
Published On

मुंबई: मालाड (Malad) मधील मैदानाला (ground) टिपू सुलतान (Tipu Sultan) क्रिडांगण असे नाव देण्याचे ठरलेच नाही. पण यावरुन भाजप (BJP) मुंबईला (Mumbai) अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई शांत आहे. जर दंगल घडण्याचा कोणी प्रयत्न करत असणार आहे, तर मग मैदानात या असे आव्हान मुंबईच्या महापौर (Mayor) किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) यावेळी भाजपला दिले आहे.

हे देखील पहा-

तसेच या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचे (Rani Lakshmibai) नाव देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. मालाडच्या (Malad) मैदानाला टिपू सुलतान क्रिडांगण असे नाव देण्यात येत आहे असा आरोप करत काल भाजपने मुंबईमध्ये आंदोलन केले होते. आता यावर मुंबईच्या महापौरांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले की, "मुंबई स्थिर आहे, तिला अस्थिर करु नका. मैदानाला टिपू सुलतान असे नाव देण्याचे महापालिकेने (Municipal Corporation) कधी ठरवलेच नाही.

"साप म्हणून दोरी आपटायचं काम भाजपनं करू नये"- Kishori Pednekar
कडू लिंबाचे झाड ठरलं! प्रशासनाची डोकेदुखी; चक्क आमदारांना देखील झाडावर चढण्याची आली वेळ

भाजपला न झालेल्या गोष्टीवरुन मुंबई अस्थिर करायची आहे. कुणाला हवीय दंगल? दंगल (Riot) घडवून तरी दाखवा, मग बघा..." टिपू सुलतान यांचे नाव मुंबईतील मैदानाला या अगोदर देण्यात आले होते. पण भाजप आता राजकारण (Politics) करत असून मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com