बीड: बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडू लिंबाचे झाड जिल्हा प्रशासनाची (District Administration) डोकेदुखी ठरत असल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. याचे कारणही तसेच आहे. या झाडावर आतापर्यंत जवळपास 8 ते 10 वेळा शोले स्टाईल (Sholay style) आंदोलन करत, आंदोलकांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेतले आहे.
हे देखील पहा-
मात्र, या झाडावर वारंवार चढतांना एखादी दुर्घटना होऊ शकते, यासाठी आंदोलक पाहिल्यानंतर आता या कडूलिंबाच्या झाडाला (Neem Tree) जाळी लावण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी यावेळी केली आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) बीड शहरातील नगरपालिका (Municipality) मधील महिला कर्मचाऱ्यांनी वेतानासाठी या झाडावर चढून तब्बल २ तास ठिय्या आंदोलन करण्यात आला होता.
महिलेला खाली उतरवण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) यांना, देखील झाडावर चढून तिची विनवणी करून खाली घ्यावे लागले होते. यानंतर मात्र आता हे कडूलिंबाचे झाड जिल्ह्यात चर्चेत आले असून प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आंदोलकाचा जीव वाचवण्यासाठी या झाडाला जाळी लावण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केले आहे.
Edited by- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.