कठडा नसलेला पुल जीवावर बेतला; बापाच्या मृत्यूनं मुलीचं ऑनलाईन शिक्षण थांबलं जयेश गावंडे
महाराष्ट्र

कठडा नसलेला पुल जीवावर बेतला; बापाच्या मृत्यूनं मुलीचं ऑनलाईन शिक्षण थांबलं

अकोल्यातील मन नदीच्या पुलावर मागील वर्षभरात अपघाताच्या अनेक घटना घडत आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील मन नदीच्या पुलावर मागील वर्षभरात अपघाताच्या अनेक घटना घडत आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे (Bridge) काम सुरु असून, कंत्राटदाराच्या हलगर्जीपनाचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचे दिसत आहे. या पुलाला संरक्षण कठडे (walls) नसल्यामुळे या पुलावरून दुचाकीस्वार पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

अपघातातील (Accident) मृतक अकोला (Akola) जिल्ह्यातील हाता या गावातील ३६ वर्षीय इसम असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेगाव- अकोट या राष्ट्रीय महामार्गावरील (national highway) शेगाव जवळील मन नदीच्या (river) पुलावर नवीन पुलाचे बांधकाम मागील वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु आहे. या पुलावर आतापर्यंत ४ वेळा मोठी अपघात घडले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

या पुलावर संरक्षण कठडे आवश्यक असतांना या ठिकाणी कठडे लावण्यात आले नाहीत. याचा परिणाम म्हणून रविवारी रात्री बाळापूर (Balapur) येथील शेख राजिक आणि शेख अमीर (वय- ३६) वर्ष हा इसम मोटारसायकलने शेगावावरून गावाकडे जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर इसम मोटार सायकल सह पुलाखाली पडला आहे.

यामध्ये त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी शौचास जाणाऱ्या व्यक्तींना हा अपघात दिसल्याने याची माहिती पोलिसांना (police) देण्यात आली. मृतक शेख राजिक हे आपल्या मुलीच्या ऑनलाईन (Online) शिक्षणासाठी मोबाईल आणण्यासाठी शेगावला गेले होते. परत येत असताना हा अपघात घडल्याने गावामध्ये (village) मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT