"त्या पार्टीत कोण होतं त्याचा उलगडा करा"; किशोरी पेडणेकरांचं शेलारांना आव्हान...(पहा व्हिडिओ)

मुंबईत एकूण कोरोना संकट कमी झालं नाही.
"त्या पार्टीत कोण होतं त्याचा उलगडा करा"; किशोरी पेडणेकरांचं शेलारांना आव्हान...(पहा व्हिडिओ)
"त्या पार्टीत कोण होतं त्याचा उलगडा करा"; किशोरी पेडणेकरांचं शेलारांना आव्हान...(पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

मुंबई : मुंबईत एकूण कोरोना संकट कमी झालं नाही. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केलेल्या त्या प्रश्नामुळे राजकीय (Political) वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. चित्रपट निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) घरी झालेल्या पार्टीमध्ये काही लोक कोरोना (Corona) बाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यावेळी या पार्टीमध्ये फक्त ८ लोक होते की, काही आणखी लोक होते का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला होता.

पहा व्हिडिओ-

राज्य सरकारचा (State Government) कोणता मंत्री या पार्टीमध्ये सहभागी होता का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. यावर आता मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांना थेट चॅलेंज (Challenge) केले आहे. करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारचा कोणता मंत्री सहभागी होते का? मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती.

"त्या पार्टीत कोण होतं त्याचा उलगडा करा"; किशोरी पेडणेकरांचं शेलारांना आव्हान...(पहा व्हिडिओ)
शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी! ओमिक्रॉनमुळे सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याविषयी आशिष शेलार यांना काही प्रश्न विचारत, त्या पार्टीमध्ये कोण होते हे तुम्ही सांगायचे, असे आव्हान पेडणेकर यांनी शेलारांना यावेळी केले आहे. दरम्यान, 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला (Movies) २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करणने नुकतेच त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीला करीना कपूर (Kareena Kapoor), अमृता अरोरा, आलिया भट्ट, सोहैल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांच्याबरोबरच इतरही काही सेलिब्रिटी (Celebrity) उपस्थित होते. त्यापैकी करीना, अमृता, सीमा आणि महीप यांना कोरोनाची (Covid 19) लागण झाली होती. त्यामुळे ही पार्टी चर्चेचं कारण ठरत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com