Ramshej fort Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: रामशेज किल्ल्यावर गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

या घटनेने शिवपुरी चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - पावसाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने आणि शनिवारची सुटीमुळे सिडकोतील शिवपुरी चौकात राहणारे सरोवर कुटुंब शहराच्याजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी पर्यटनासाठी दिंडाेरी (Dindori) तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन मृत्यू झाला. हा तरुण सिडकोतील शिवपुरी चौकात वास्तव्यास हाेता. या घटनेने सिडको (Cidco) परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. अजय सरोवर मृत तरुणाचे नाव आहे

चक्कर आल्यावर त्यास त्याच्या काही मित्र आणि नातेवाईकांनी त्याला उचलून खाली आणले व जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. या घटनेने शिवपुरी चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पाहा -

सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे काल सकाळी रामशेज किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर अजय चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉकटरांनी मृत घोषित केले. अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

रमेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अजयचे वडील हे सिडको परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करतात. अजयच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

Maharashtra Live News Update: आमदार रवी राणांचा कडूंवर पुन्हा गंभीर आरोप

Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदाने केलय फोटोशूट, दिसते खुपच सुंदर

Chanakya Niti: घरात पैसा टिकत नाहीये? चाणक्यांनी सांगितलेले ५ नियम आतापासून फॉलो करा

Kitchen Tips : भाजी खूप तिखट झाली? पटकन करा 'हा' उपाय, चव बिघडणार नाही

SCROLL FOR NEXT