Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: खळबळजनक! वर्चुअल रियालिटी हेडसेट देत नसल्याने १० वर्षीय मुलाने आईची केली हत्या

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकशीसाठी मुलाला ताब्यात घेतले.

साम टिव्ही ब्युरो

Crime News:आपल्याला हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर लहान मुलं रडून पूर्ण घर डोक्यावर घेतात. मात्र अमेरिकेत काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एका १० वर्षांच्या मुलाने आईने हट्ट पूर्ण न केल्याने तिची गोळी झाडून हत्या केली आहे. सध्या हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना २१ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील (Amerika) मिलवॉकी येथे घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकशीसाठी मुलाला ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने चुकून गोळी लागल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तो मनोरुग्ण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

वर्चुअल रियालिटी हेडसेटसाठी आईची हत्या

मुलाची मावशी आणि बहिण (Sister)यांनी सांगितले की, त्याला वर्चुअल रियालिटी हेडसेट पाहिजे होता. यासाठी त्याने दोन दिवस आईकडे हट्ट केला. मात्र आईने हेडसेट देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळी झाडली. आईचा (Mother) मृत्यू झाला आता आई आपल्याला परत कधीच नाही दिसणार याचे त्याला जराही दु:ख झाले नाही. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी आईच्या अॅमेझॉन अकाउंट वरून वर्चुअल रियालिटी हेडसेट ऑर्डर केला. तसेच त्याच दिवशी त्याने ७ वर्षीय चुलत भावावरही हल्ला केला, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

या घटनेत मुलाने आईच्या हत्येसाठी वापरलेली बंदूक आई कामात असताना गपचूप स्वत:कडे चोरून ठेवली होती. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कुटुंबीयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे आईचे निधन झाले आहे तर दुसरीकडे मुलावर कारवाई आणि त्याचा मानसीक आजार याने कुटुंबीय त्रस्त आहेत. अशात लहान मुलांच्या वकील एंजेला कनिंघम यांनी १० वर्षाच्या मुलावर होणाऱ्या कारवाईवर मत देत हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?

SCROLL FOR NEXT