Aai Kuthe Kay Karte: 'त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्रास ही होतो', अभिनेते मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट

जीवनात घडलेल्या एका वाईट घटनेमुळे अभिनेते मिलिंद गवळी यांनी फटाके वाजवणे बंद केले.'
Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte Instagram @milindgawali
Published On

मुंबई: देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत आहे.सर्वसामान्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत सगळेचजण दिवाळी साजरी करतात. अनेक सेलिब्रिटींनी दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तर काही कलाकारांनी दिवाळीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात आई कुठे काय कारते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अनिभिनेता मिलिंद गवळी यांचा देखील समावेश आहे. मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटते. त्यातील एक नाव म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद एका वडिल, पती, मुलगा अशी भूमिका साकारत आहे. तो मुलगा म्हणून जितका चांगला आहे, तितकाच विचित्र नवरा आहे. त्याची मुले त्याच्यासाठी सर्वकाही आहेत. अनिरुद्ध या पात्राचे तसेच मिलिंदचे सुद्धा लाखो चाहते आहे. या चाहत्यांना मिलिंदने इंस्टाग्रामवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. (Social Media)

Aai Kuthe Kay Karte
Bigg Boss Marathi 4: अपूर्वा नेमळेकरला कोसळले रडू, जवळची व्यक्ती 'बिग बॉसच्या घराबाहेर गेल्याने झाली दु:खी

काय आहे मिलिंद गवळी यांची पोस्ट

शुभ दीपावली

घराच्या बाहेर पडताना मास्क लावायला सुरुवात करा, फटाक्यातल्या दारूच्या धुराने प्रचंड वायू प्रदूषण होतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, शहरांमध्ये वायु प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे त्यात या फटाक्याच्या दारूगोळ्यामुळे फेपड्यांचे आजार होतात, जास्ती करून लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना,

दीपावली , दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे, दिवे लावा कंदी लावा, वायु प्रदूषण करणारे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे फटाके काय वाजवतय?

मलाही लहानपणी फटाक्यांचे फार वेड होतं, इतकं की मी पाचवीत असताना माझी आई पोटाच्या आजारामुळे केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती, माझे वडील मला घेऊन केईएम ला तिला भेटायला घेऊन गेले, दिवाळीचे दिवस होते, माझी आई बेडवर झोपली होती, मी आईजवळ गेलो, आणि तिला म्हणालो की पप्पांनी मला फटाके घेऊन दिले नाहीत तू सांग त्यांना मला फटाके विकत घेऊन द्यायला, तीने वडीलांना सांगितलं की घरी जाताना त्याला फटाके घेऊन द्या. या परिस्थितीत सुद्धा केइम हॉस्पिटल मधनं वडिलांनी मला फटाक्याच्या दुकानात नेलं आणि म्हणाले "घे तुला काय फटाके घ्यायचे ते", मी फटाके घेतले पण नंतर मला या गोष्टीचा खूप वाईट वाटलं कि माझी आई hospital मध्ये ऍडमिट असताना मी तिच्याकडे फटाक्यासाठी हट्ट केला, आजही ते आठवलं तरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्रास ही होतो,

तेव्हा पासून आज पर्यंत माझी फटाके वाजवायची इच्छा निघून गेली आहे,

तुमच्या आयुष्यात दिवाळीच्या काही गोड आंबट तिखट आठवणी असतीलच,

चकल्या करंज्या लाडू चिवडा शेव आणि सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे अनारसे यांच्या वर्षानुवर्षाच्या आठवणी असतीलच, काहींच्या घरी अजूनही हे पदार्थ बनत असतील, खमंग वास पसरला असेल, काहीं कडे बाहेरून घरगुती पद्धतीचं फराळ मागवला असेल.

दिवाळी हा खूप छान सण आहे आपण छान पद्धतीने साजरा करूया. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये सांगितली आहे. तसेच दिवाळी साजरी करताना काळजी घ्या असे आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे. दिवाळी दरम्यान खूप वायू प्रदूषण होते आणि त्याचा अनेकांना त्रास देखील होतो, त्यामुळे दिवे आणि कंदील लावून दिवाळी साजरी करा असे त्यांनी सांगितले आहे. (TV)

मिलिंद गवळी हे अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये सुद्धा काम केले आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून ते पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओची लोकप्रियता बघून प्रेक्षकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते. (Diwali)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com