Bigg Boss Marathi 4: अपूर्वा नेमळेकरला कोसळले रडू, जवळची व्यक्ती 'बिग बॉसच्या घराबाहेर गेल्याने झाली दु:खी

दिवाळी स्पेशल असलेल्या या चावडीत दिवाळी अंकाद्वारे सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी बिग बॉसनी दिली.
New Bigg Boss Logo
New Bigg Boss LogoSaam Tv
Published On

Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी 4' सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. सगळेच स्पर्धक 'बिग बॉसच्या घरात रुळायला लागले आहेत. इथे अनेक नाती बनण्यास सुरूवात झाली आहे. या नात्यांमुळे स्पर्धा अधिकच रंजक होणार आहे कारण याचा थेट परिणाम स्पर्धकांच्या कार्यावर होणार आहे. या आठवड्यात चावडीवर ही नात्यांची मजा पाहायला मिळाली. तसेच एक सदस्य घर सोडूनही गेला.

'बिग बॉस मराठी 4'ची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. या भागात आरोप प्रत्यारोप तर झालेच पण त्याचबरोबर काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे, असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन अशी सक्त ताकीद योगेशला मिळाली.

New Bigg Boss Logo
Film On Ramayana: रामायणावर आधारित चित्रपटाला बॉलिवूडमध्ये सीता मिळेना...
Megha Ghadge ANd Mahesh Manjrekar
Megha Ghadge ANd Mahesh ManjrekarSaam Tv

दिवाळी स्पेशल असलेल्या या चावडीत दिवाळी अंकाद्वारे सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी बिग बॉसनी दिली. तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी दिवाळी अंकामध्ये लेख लिहिला. अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकासाठी. (Bigg Boss Marathi)

बिग बॉसच्या चावडीमध्ये चुगली बूथद्वारे करण्यात आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा अमृता धोंगडे वर चांगलीच भडकली, "आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले. तसेच दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर तेजस्विनीला रिमोट कंट्रोल देण्यात आले. अपूर्वाला काडेपेटीसह अनेक भेटवस्तू मिळाल्या. (Diwali)

वूट आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. विकास, किरण माने सांगतात तेच तो करतो. नेहमी त्यांच्या मागे पुढे असतो. हे कारण देत प्रेक्षकांनी विकासला आरोपी ठरविले.

Megha Ghadage
Megha GhadageSaam Tv

या सगळ्यानंतर शेवटी वेळ आली ती एलिमिनेशनची. या आठवड्यात किरण माने. अमृता देशमुख आणि मेघ घाडगे यांना नॉमिनेट करण्यात आले होते. अखेर प्रेक्षकांची सर्वात कमी मते मिळाल्याने मेघा घाडगेला घराबाहेर जावे लागले. "अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं... किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. एव्ही पाहिली मी, या माणसापासून सांभाळून राहा" असा सल्ला मेघा घाडगेने इतर सदस्यांना दिला. (Program)

येणाऱ्या आठवडा 'बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांसाठी काय घेऊन येईल हे पाहणं महत्वाचं असेल. कोण राहील ? कोण जाईल ? हे त्यांचा गेमच ठरवेल. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? हे सगळं 'बिग बॉस मराठी च्या येणाऱ्या भागात आपल्याला कळणारच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com