Film On Ramayana: रामायणावर आधारित चित्रपटाला बॉलिवूडमध्ये सीता मिळेना...

सीतेची भूमिकेसाठी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलेले नाही.
Hrithik Roshan And Ranbir Kapoor
Hrithik Roshan And Ranbir KapoorSaam Tv
Published On

Film On Ramayana Update: जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सॅनॉन स्टारर आदिपुरुष या चित्रपटानंतर रामायणाची कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दंगल आणि छिछोरे चित्रपटांचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रामायणाच्या कास्टिंगला सुरूवात केली असल्याच्या बातम्यांची सध्या जोरदार चर्चा आहे.

आगामी रामायण मोठ्या पडद्यासाठी बनवले जात आहे की वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर येणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण या कथेसाठी कास्टिंग सुरू झाल्याची चर्च जोरात आहे. हृतिक रोशन या रामायणातील रावणाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर रामच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या नावाची चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी यांच्या या रामायणात सीतेची भूमिकेसाठी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलेले नाही.

Hrithik Roshan And Ranbir Kapoor
Suhana Deepika Looks: शाहरुख खानची मुलगी सुहानाचे काय आहे दीपिकाशी नाते, सोशल मीडियावर चर्चांना उधाण...

नितेश तिवारी यांच्या रामायणात सीतेची भूमिका प्रसिद्ध तामिळ, तेलगू आणि मल्याळम अभिनेत्री साई पल्लवी साकारणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार नितेश तिवारी यांचा हा प्रोजेक्ट एक चित्रपटच आहे. यामध्ये साई पल्लवी रावण हृतिकसोबत आणि राम रणबीर कपूरसह काम करण्यासाठी तयार आहे. यापूर्वी सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणच्या नावाचा विचार करण्यात आला होता.

या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर गेल्या दीड वर्षांपासून काम सुरू असून 2023 मध्ये त्याचे शूटिंग सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट असेल. पुष्पा चित्रपटातून पॅन-इंडिया स्टार बनलेल्या अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद याची निर्मिती करणार आहेत. (Movie)

जेव्हा नितेश तिवारी यांनी या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून त्यांना सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. अनेकांनी आदिपुरुषाचा टीझर पाहिला आहे. सर्वांना रामायणाची कथा माहित आहे, तरीही निर्माते या कथेवर वारंवार चित्रपट का बनवत आहेत असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. आदिपुरुषच्या टीझरने लोकांची खूप निराशा केली आहे आणि चित्रपटाचा विरोध होत आहे. त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तर गेल्या वर्षी घोषणा झालेल्या या चित्रपटाची लोक खूप वाट पाहत आहेत. (Boycott)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com