Ahilyanagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित थरार, आठवीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकूहल्ला

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या विद्यार्थ्याच्या दोन वर्गमित्रांनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गमित्रांनी चाकूने सपासप वार केले.

  • घटना पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात भरदिवसा घडली.

  • गंभीर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. २ वर्गमित्रांनीच भरदिवसा या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी चाकू हल्ला केला. वेदांत दत्तात्रय कुलट असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. जखमी विद्यार्थ्याच्या पाठीवर धारदार चाकूने वार करण्यात आले. हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

जखमी विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेदांत कुलट हा शहरातील एका शाळेमध्ये आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी परीक्षा असल्याने तो दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आला होता.

शाळेतून आल्यानंतर एका खासगी कामानिमित्त तो दुचाकीवरून शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गेला होता. याच दरम्यान त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले. किरकोळ वादातून एका मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. सध्या हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा देखील शोध घेत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT