Crime : सोशल मीडियावर ओळख, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल; शाळकरी मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार

Crime News : १६ वर्षीय शाळकरी मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने सोशल मीडियाद्वारे पीडितेशी ओळख केली. तिला शाळेतून हॉटेलमध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
Crime News
Crime News x
Published On
Summary
  • १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • आरोपीने सोशल मीडियावर पीडितेशी केली ओळख

  • अश्लील व्हिडीओ बनवून आरोपी देत होता धमकी

Shocking : एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हे सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले होते. आरोपीने मुलीला तिच्या शाळेतून हॉटेलमध्ये नेले. हॉटेलवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला परत सोडले. ही घटना हरियाणाच्या पानिपतमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता १६ वर्षीय मुलगी ही हरियाणाच्या पानिपतमध्ये राहते. सोशल मीडियावर तिची एका मुलाशी ओळख झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. एकमेकांशी बरेच दिवस बोलल्यानंतर आरोपीने पीडितेला भेटण्यासाठी राजी केले. त्यानंतर आरोपी पानिपतला पोहोचला. त्याने मुलीला तिच्या शाळेच्या बाहेरुन कारमध्ये बसवले आणि सहारनपूरला एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर त्याने पीडितेला पानिपतमध्ये सोडले.

Crime News
Dharashiv : हात मोडले, डोके फोडले! दगड-काठ्या घेऊन जमावाची मारहाण, धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीत राडा

घरी पोहोचल्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना या घटनेबाबत सांगितले. तिच्या कुटुंबियांनी चांदणी बाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या लेखी तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीचा तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

Crime News
Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा हादरा, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सोहन असल्याचे समोर आले आहे. सोहन हा सहारनपूरचा रहिवासी आहे. त्याने पीडितेचे अश्लील फोटो, व्हिडीओ बनवले आहेत. याद्वारे तो पीडितेला ब्लॅकमेल देखील करत होता. जर पीडितेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला असता, तर तो तिला जीवे मारण्याची धमकीही देत होता. याआधीही त्याने मुलींना फसवून त्यांचा गैरफायदा घेतला आहे.

Crime News
Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com