Bachchu Kadu on womens Reservation saam Tv
महाराष्ट्र

Womens Reservation: ७५ % महिला प्रतिनिधींचं काम त्यांचे नवरोबाच पाहतात; महिला आरक्षण विधेयकावर बच्चू कडू बोलले

Bachchu Kadu on womens Reservation: सोलापूर येथे ‘शासन दिव्यांग्यांच्या दारी’हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी महिला आरक्षणावर आपली भूमिक मांडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bachchu Kadu Criticism On women's Reservation:

मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे तर दुसऱ्या बाजुला या मुद्द्यावरून नेतेमंडळी एकमेकांना टोला लगावत आहेत. दरम्यान भाजप सरकारनं महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत सादर केल्यानंतर महिलांकडून सरकारचं कौतुक केलं जातंय. (Latest Politics News)

राजकारण महिलांचा सहभाग वाढेल, अशी आशा अनेक नेतेमंडळीकडून व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान प्रहार संघटना प्रमुख आणि आमदार बच्चू कडूंनी राजकारणातील महिलांच्या अस्तित्व काय याचं सत्य समोर आणलंय. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर बच्चू कडूंनी माध्यमांशी चर्चा केली. आजही ७५ टक्के महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी क्रियाशील नाहीत, त्यांचे नवरोबाच सर्व काम पाहतात.

दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आधीपासूनच आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के महिला राज आधीपासूनच आहे. परंतु यातील अनेक महिलांचे पती परमेश्वरच कारभार हाकत असतात, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली. दरम्यान राज्यात सरपंच, नगराध्यक्ष, आमदार म्हणून म्हणून उत्तम काम करत आहेत. महिलांना आता आणखी संधी मिळणार असल्याने त्याचे निश्चितपणे सोनं करतील, असा विश्वासही त्यांनी वर्तवला.

केंद्र सरकारनं आरक्षणाचा कायदा पारित केला तर विधानसभेतील महिलेचा राजकारणातील सहभाग जवळपास चार पटीने असणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. ३३ टक्के आरक्षण विधानसभेत लागू झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेतील ९६ जागा या महिलांसाठी राखीव होतील. या विधेकयकामुळे महिला वर्गात आनंद आहे. पण पुरुष नेत्यांमध्ये मात्र जोरदार कलगीतुरा रंगलाय.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विजय वडेवट्टीवार यांनीही आरक्षणावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार उत्तर दिलंय. २०१० मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, मात्र महिला आरक्षण देण्याची इच्छा नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे धाडस करून आरक्षण दिलंय. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात असं विखे-पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT