परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर लातूर विभागात कर्मचारी हजर; एसटी क्षमतेने धावणार? Saam Tv
महाराष्ट्र

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर लातूर विभागात 70 कर्मचारी हजर; ST क्षमतेने धावणार?

सद्य:स्थितीत ८० बसेसच्या ३६४ फेऱ्यांतून १३ लाखांवर उत्पन्न

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर सहभागी होण्यासाठी शेवटचे अल्टिमेटम दिले असून, त्यांच्या आवाहनानंतर लातूर विभागातही ७० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अद्याप लातुर विभागात १५०२ कर्मचारी संपातच आहेत. (Latur ST Strike News Update)

सद्य:स्थितीत पाच आगारांतून ८० बस धावतआहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. इतका दीर्घकाळ संप राहण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. आणखी संप (ST Strike) मिटलेला नाही. सर्व प्रयत्न करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने परिवहनमंत्र्यांनी शेवटचा अल्टिमेटम दिल्यानंतर लातूर (Latur) विभागात ३२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आता उद्यापर्यंत किती कर्मचारी होणार याकडे लक्ष लागले आहे.

परिवहनमंत्र्यांच्या अल्टिमेटमनंतरही १५०२ कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसते आहे. दोन दिवसांपूर्वी अल्टिमेटम दिल्यानंतर फक्त ७० कर्मचारी कामावर आले आहेत.

लातूर येथील औसा रोडवरील आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांचा दिवसभर ठिय्या असतो. आंदोलन करणारे काही कर्मचारी आंदोलनस्थळीच मुक्कामी असतात. आता संपाची तीव्रता हळूहळू कमी होत आहे. दररोज कामावर येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

हे देखील पहा-

सध्या लातूर ३२, निलंगा १९. उदगीर १४ औंसा ८ आणि अहमदपूर ७ अशा एकूण ८० बसच्या ३६४ फेऱ्या सुरू आहेत. शासनाच्या आवाहनानंतर ७० जण कामावर हजर झाले आहेत. बडतर्फ आणि निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचेही अपील येत आहेत. त्यावर तात्काळ निर्णय घेऊन त्यांना कामावर रुजू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या लातूर विभागात ८० बस धावत आहेत. दिवसाला १३ लाखांच्या आसपास उत्पन्न आहे. असे वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

SCROLL FOR NEXT