नांदेडमध्ये स्कुल व्हॅन उलटून 7 विद्यार्थी जखमी; चालकावर गुन्हा दाखल! संतोष जोशी
महाराष्ट्र

नांदेडमध्ये स्कुल व्हॅन उलटून 7 विद्यार्थी जखमी; चालकावर गुन्हा दाखल!

17 शाळकरी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या गाडीमधून सगरोळी येथे शाळेत जात असताना चालकाचे त्या स्कुल व्हॅन वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडNanded येथे स्कुल व्हॅन School Van उलटून झालेल्या अपघातामध्ये Accident सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर घटना ही बिलोलीBiloli तालुक्यातील सगरोळी येथे आज सकाळी घडली आहे. बोळेगाव Bolegaon येथून 17 शाळकरी विद्यार्थीStudents शाळेत जाण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या गाडीमधून सगरोळी येथे शाळेत जात असताना चालकाचे त्या स्कुल व्हॅन वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे.7 students injured in school van overturn

हे देखील पहा-

अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना समजतात त्या स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमी विद्यार्थ्यांना सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सपतलवार DR.B.M Saptalvar यांनी दिली आहे.या प्रकरणी व्हॅन चालका विरोधात बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या पाल्यांना शाळेसाठी दुरवरती पाठवत असलेले पालक पुन्हा एकदा वाहनचालकांच्या ड्रायव्हींगमुळे चिंतेत सापडले आहेत. आधीच कोरोनाचे संकट डोक्यावरती घोंघावत असतानाही मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या काळजीपोटी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून जर असे प्रकार घडत असतील तर मुलांचा जीव महत्वाचा की शाळा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तरी सर्व ड्रायव्हर लोकांनी आपण दुसऱ्यांच्या घरातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना किमाण वेग मर्यादेतच गाडी चालवावी हे सांगण्याची वेळ आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT