सांगली : पोलिसPolice आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकारGoverment चालत आहे. त्यामुळे "अटॅक इज बेस्ट डिफेन्स"त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही असा कानमंत्रच चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगलीतील भाजपाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.'Attack is the best defense' Chandrakant Patil's advice to BJP workers
हे देखील पहा-
भाजपच्या सांगली जिल्हा नूतन कार्यालयाचेBJP New Office उद्घाटन सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरMVA जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण वारंवार सांगत होतो की सर्व नेत्यांशी चर्चा करा मात्र त्यांनी एकलं नाही आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा उद्धव ठाकरेUddhav Thackeray स्वताहून सर्वपक्षीय नेत्यांना बैठक घेत आहेत. असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेNarayan Rane यांच्यावरील कारवाई बाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले. ज्या पद्धतीने हा कारभार सुरू आहे. ते पाहता. पोलिस व गावगुंडाच्या जोरावर हे सरकार चालत आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या आपण सक्षम आहोत आणि त्यामुळे मागील 22 महिन्यात एकही केस राज्य सरकार जिंकू शकलेलं नाही आणि काल पण नारायण राणे प्रकरणात ते हरले आहेत. आज आपल्या सोबत मुंबईत अदृश्य वकिलांची टीम काम करत आहे. अनिल परब यांच्यावर याचिका दाखल करण्यासाठी काम सुरू आहे. असंही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
केस दाखल होतात, पण जास्तीत जास्त केस दाखल होणे म्हणजे राजकीय दृष्ट्या चांगली गोष्ट आहे. आज 3 पार्ट्या शेवटची फडफड करत आहेत. तर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक झालं पाहिजे अटॅक इज बेस्ट डिफेन्सत्यामुळे अंगावर गेल्या शिवाय काही होणार नाही. असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.
22 महिन्यामध्ये विरोधकांकडून भाजपा कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही फुटला नाही. उलट आम्ही गनिमी काव्याने, काम करतो त्यांचे कार्यकर्ते फोडत आहोत. तसेच ओबीसी आरक्षण मिळाल्या शिवाय कोणत्याही निवडणूक भाजपा होऊ देणार नाही. आणि जी पोट निवडणूक होईल,ती भाजपा जिंकणार आणि देगलूर येथीलही पोट निवडणूक भाजपा जिंकणार,असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Edited By -Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.