२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता.बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला होता .या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी लोकांना धार्मिक ओळख विचारून त्यांना मारुन टाकले होते. त्यावरचं आता जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला गेला असून, सुरक्षा दलांनी त्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत दिली.
ऑपरेशन सिंदुरवर लोकसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान अमित शाह म्हणाले की, जम्मू - काश्मीर पोलिस सीआरपीएफ आणि भारतीय सैन्याच्या संयुक्त कारवाईत सुलेमान, जिब्रान आणि अफझल या तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्याचबरोबर हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन रायफल्सने जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अमित शाहा यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.