Police Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : बीड हादरलं! चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य

बीडमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे

विनोद जिरे

Beed Crime News : बीडमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बीडमध्ये ६ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात ६ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून ६० वर्षीय अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. विष्णु सादुळे आरोपीचे नाव आहे.

याविषयी पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले.

त्यानंतर तिने सांगितले की, ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णु सादुळे हा तिथे आला. व म्हणाला "चल तुला चॉकलेट देतो" असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला.

विष्णुने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बीड (Beed) जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे अशा घटना घडत असल्याने, महिला आणि मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उबाठाचे पाच आमदार संपर्कात, 2-3 सोडता सर्व आमच्याकडे येणार; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

महिलांसाठी वरदान ठरतंय रिजनरेटिव्ह मेडिसिन; काय आहे ही नेमकी उपचार पद्धती?

VIDEO : मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल; विधानसभा निकालावर मनोज जरांगेंचा टोला

Mumbai : मुंबईच्या गोंगाटातून थोडी शांती हवीय? 'हे' पुरातन मंदिर ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT