Dombivli News : डोंबिवली पूर्वेकडील बहुमजली इमारतीला भला मोठा तडा; सुदैवाने जीवितहानी नाही

या इमारतीमधील 42 कुटुंबांना सुखरूप घराबाहेर काढलं.
Dombivli News
Dombivli News Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख

Dombivli Building News : डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरातील शांती उपवन कॉम्प्लेक्स मधील एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. इमारतीमधील रहिवाशांना जोरदार आवाज ऐकू आला त्यामुळे तात्काळ इमारतीमधील रहिवाशांनी इमारती बाहेर धाव घेतली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Dombivli News
Political News : ३७० कलम हटवण्याचा फायदा कोणाला झाला? काश्मिरी पंडितांच्या हत्या सत्रावरून संजय राऊतांची टीका

शांतीवन कॉम्प्लेक्स सुमारे वीस वर्षे जुनी इमारत आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अडीचशे कुटुंब राहतात. तर थोडा गेलेल्या विंगमध्ये 42 कुटुंब राहत होते. अग्निशमन विभागाला सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान या इमारतींमधील कुटुंबांना आसपासच्या शाळा व समाज मंदिर हॉल मध्ये स्थलांतरित करण्यात आले असून सदर इमारत (Building) निष्कासित करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वतीने सांगण्यात आले .

डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात शांती उपवन कॉम्प्लेक्स मध्ये एकूण पाच विंग असून हे कॉम्प्लेक्स 20 वर्ष जुने आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये एकूण 240 कुटुंब राहतात.आज रात्रीच्या सुमारास या कॉम्प्लेक्स मधील एफ विंग मध्ये जोरदार आवाज झाला. काही घरांमध्ये माती देखील पडली त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी इमारती बाहेर पळ काढला.

काही क्षणातच इमारतीला भला मोठा तडा गेल्याचं रहिवाशांना दिसून आलं. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन विभाग व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला तडा गेलेल्या या इमारतीमधील 42 कुटुंबांना सुखरूप घराबाहेर काढलं.

Dombivli News
Mumbai Water Cut : उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; 'या' भागात 3 दिवस 10% पाणीकपात

त्यानंतर इमारत धोकादायक झाल्याने या कॉम्प्लेक्समधील सर्वच विंग मधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि ही इमारती रिकामी करण्यात आली. सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत निष्कासित करणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान इमारती मधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या शाळा व समाज मंदिर हॉल मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत पुनर्बांधणी करण्यासाठी संबधित बिल्डरकडे वारंवार मागणी केली मात्र संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com