Mumbai Water Cut : उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; 'या' भागात 3 दिवस 10% पाणीकपात

Mumbai Water Cut News : 'या' दोन दिवशी दहा टक्के पाणी कपात
Mumbai Water Supply News
Mumbai Water Supply NewsSaam Tv
Published On

Mumbai News Update : मुंबईकरांना उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी बीएमसीने पाइपलाइन आणि व्हॉल्व्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणीकपात करण्यात येणार आहे. 9 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 10 टक्के पाणीकपात होणार आहे.  (Latest Marathi News)

Mumbai Water Supply News
Dhule News: मध्‍यरात्रीस अवकाळी पाऊस; गहू जमीनदोस्‍त, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बीएमसीच्या (BMC) पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान दक्षिण मुंबईतील ए वॉर्ड कुलाबा, बीपीटी कॉलनी, बी वॉर्ड (सँड हर्स्ट रोड), भायखळा, एनएम जोशी मार्ग, परळ यासह माटुंगा, सायन या भागात पाणीकपात होणार आहे. तसेच पूर्व उपनगरातील कुर्ला पूर्व, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडमध्येही कपात करण्यात येणार आहे.

ठाण्यातील कोपरी पुलाजवळील ठाणे महापालिकेच्या नवीन पुलाचे काम 9 ते 11 मार्च दरम्यान सुरू असल्याने मुंबई महापालिकेच्या 2345 मिमी व्यासाच्या 'मुंबई 2' या पाइपलाइनचे नुकसान आणि पाणी गळतीची माहिती मिळाल्याचे बीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai Water Supply News
PM Modi News : उद्धव ठाकरे, शरद पवारांसह विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांचं PM मोदींना थेट पत्र; पत्रास कारण की....

कुर्ल्यात 6 मे पर्यंत दर शनिवारी पाणी येणार नाही

कुर्ल्यात शनिवारपासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे, जी 6 मे पर्यंत दर शनिवारी होणार आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम 4 मार्चपासून सुरू झाले आहे, जे 6 मे पर्यंत चालणार आहे. कुर्ल्यातील खैराणी रोडच्या खाली असलेल्या तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिरादरम्यानची पाणीपुरवठा पाईपलाईन या काळात दुरुस्त करण्यात येणार आहे. या कामाला 10 दिवस लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com