Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत? ६० लाख लाडक्या बहिणी बाद?

Ladki Bahin Yojana Maharashtra : ६० लाख लाडक्या बहिणींची नावं लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाऊ शकतील असे म्हटले जात आहे. योजनेमध्ये कोण अपात्र राहणार हे सविस्तरपणे जाणून घ्या.

Yash Shirke

विनोद पाटील साम प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana Update : आता लाडक्या बहिणीसांठी सर्वात मोठी बातमी. तब्बल ६० लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे. विरोधकांसह आता सत्ताधारी नेत्यांनीही केलेल्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर सक्रांत येणार आहे? पाहूयात विशेष रिपोर्ट.

शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेंशन वाढलंय. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटोकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

नियमबाह्य अर्ज मागे न घेतल्यास वसुली करा असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजलीय. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागलीय. ही योजना बंद होणार नसली तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनीही नमूद केलंय.

कोण ठरणार अपात्र?

- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार

- ट्रॅक्टर वगळता दुसरं चारचाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र

- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्यांना लाभ मिळणार नाही

- कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार

- कुटुंबातील सदस्य आमदार, खासदार असल्यास लाभ नाही

- कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार

राज्यभरातून 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते.. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरलेत.. मात्र आता नव्याने छाननी सुरु झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे...कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलाय. निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT