Ukraine Saam Tv
महाराष्ट्र

मराठवाड्यातील 57 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले!; प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाइन नंबर जारी

मराठवाड्यातील ५७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलीये. लातूर जिल्ह्यातील २१, नांदेड जिल्ह्यातील २१, जालना जिल्ह्यातील ७, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ विद्यार्थी आहेत.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: मराठवाड्यातील ५७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलीये. लातूर जिल्ह्यातील २१, नांदेड जिल्ह्यातील २१, जालना जिल्ह्यातील ७, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत.

आतापर्यंत पालकांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. ज्या पालकांना मदत हवी आहे किंवा ज्यांची मुलं युक्रेनमध्ये आहेत, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाइन देण्यात आली आहे, त्याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सध्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेन या देशात अनेक भारतीय नागरीक आणि विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. भारतीय नागरीकांच्या मदतीसाठी नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स सुरू करण्यात आलेली आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागातील कोणतेही नागरीक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

हेल्पलाईनसाठी संपर्क क्रमांक :

औरंगाबाद जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४०-२३३१०७७ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी ९९७०९७७४५२ यांच्याशी संपर्क साधावा.

नांदेड - ०२४६२-२३५०७७ - किशोर कुर्ह ९४२२८७५८०८

उस्मानाबाद - ०२४७२-२२५६१८ - वृषाली तेलोरे - ९६६५०३१७४४

लातुर - ०२३८२-२२०२०४/ २२३००२ - साकेब उस्मानिया ९९७५४०५२२७

बीड - ०२४४२२२२६०४ - जोशी - ९४२१३४५१६५

परभणी - ०२४५२-२२६४०० - पवन खांडके - ९९७५०१३७२६

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT