Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime: 'करणी' केल्याचा संशय! सपासप वार करत शेजाऱ्याला संपवले; भयंकर घटनेने कोल्हापूरात खळबळ

Kolhapur Temlai Naka Crime: या प्रकरणात आरोपीने सूनेवर हल्ला केला; मात्र सुनेला वाचवायला आलेल्या सासऱ्याचाच यामध्ये मृत्यू झाला...

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur Crime News: कोल्हापुर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने करणी केल्याच्या संशयातून शेजारच्या मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून तलवारीने हल्ला करत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे.

आझाद मकबूल मुलतानी (वय, ५४) असं या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मुलतानी यांची सून अफसाना मुलतानी ही यामध्ये जखमी झाली आहे. शहरातील टेमलाई नाका परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवार (१६,मे) रोजी रात्री आझाद मुलतानी हे आपल्या सुनेसह ) रात्री साडे आठच्या सुमारास जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळी अचानक शेजारी राहणारा निखिल गवळी हा दारूच्या नशेत तलवारीसह घरात घुसला आणि माझ्या घरावर करणी करता का? असे म्हणत मुलतानी यांच्या सुनेवर हल्ला केला. यावेळी आझाद मुलताने हे आपल्या सुनेच्या बचावासाठी पुढे आले. (Kolhapur Crime)

त्यांना पाहताच आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने जोरदार हल्ला करत मुलतानी यांच्या खांद्यावर छातीवर आणि मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात हातावर वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या ठराव्यात ते जागीच कोसळले. कुटूंबियांनी आरडा ओरडा करताच हल्लेखोर पसार झाला. यानंतर मुलांसह नातेवाईकांनी आझाद मुलतानी यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

हल्ल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत खूनाची कबुली दिली. ज्यामध्ये त्याने करणी केल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचे सांगितले आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण कोल्हापूर शहर हादरुन केले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, निखिल गवळी हा घरात घुसला असताना घरातील तीन लहान मुले बाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यामुळे सुदैवाने या तीन मुलांचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT