Vitthal – Rukhmini Temple Devotees Poisoning  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Devotees Poisoning : उपवासाच्या फराळातून ५०० महिला-पुरूषांना विषबाधा; अनेकांची प्रकृती चिंताजनक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय जाधव, बुलढाणा)

Buldhana Vitthal – Rukhmini Temple Devotees Poisoning :

लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले आहे.(Latest News)

तर काही रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडलाय. परिसरात सद्या प्रचंड घबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झालीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आज उपवासाच्या फराळाचे प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना उलट्या, पोटदुखी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. पोलीस आणि महसूल प्रशासनाला या घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरूषांना मिळेल त्या वाहनाने बिबी, लोणार, सुलतानपूर, मेहेकर अंजनी खुर्द येथील ग्रामीण रूग्णालयात आणले.

परंतु, या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे बिबी येथील खासगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रूग्णालयात बोलावण्यात आले तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

धक्कादायक बाब अशी, की या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रूग्णांना जमिनीवर झोपून त्यांना उपचार देण्यात आले. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हात्यावर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT