Buldhana News : बुलढाणा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी छेडलं थाळीनाद आंदोलन, उपाेषणकर्त्यांना पाठिंबा

नगरपालिकेने उपोषणाची दखल घेऊन मूलभूत सुविधा व विकास कामाला सुरुवात करावे अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
youth protests near buldhana muncipal council office
youth protests near buldhana muncipal council officesaam tv
Published On

Buldhana News :

बुलढाणा नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) युवकांनी थाळीनाद आंदोलन छेडले. मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी बुलढाणा येथील काही नागरिक तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. आज युवकांनी थाळ्या वाजवून नागरिकांच्या आंदाेलनास पाठिंबा देत प्रशासनास जागं करण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

बुलढाणा शहरातील तेलगू नगर, इकबाल नगर,जोहर नगर, कमेला परिसर,मिर्झा नगर भागात मूलभूत सोयी सुविधा व विकासकामे करण्यासाठी इकबाल नगर येथील समाजसेवक जावेद कुरेशी यांच्यासाह इतर नागरिकांनी बुलढाणा नगरपरिषदेसमोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

youth protests near buldhana muncipal council office
Garlic Price Hike : लसूण महागला, गृहिणींचं बजेट कोलमडलं (पाहा व्हिडिओ)

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची नगरपालिका प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. या आंदाेलकांच्या समर्थनार्थ तसेच नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील युवकांनी थाळी वाजवून आज थाळीनाद आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नगरपालिकेने उपोषणाची दखल घेऊन मूलभूत सुविधा व विकास कामाला सुरुवात करावे अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

youth protests near buldhana muncipal council office
Sai Mandir विकासासाठी 50 कोटी : सईद खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com