File Photo saam tv
महाराष्ट्र

Elephant Kills Man: गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुडगूस; हत्तीने सोंडेत धरून आपटल्याने वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

Elephant Kills Man: गेल्या अनेक महिन्यापासून गडचिरोलीत धुडगूस माजवणाऱ्या रानटी हत्तींनी एका वन कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मंगेश भांडेकर

Gadchiroli Latest News:

गडचिरोलीमधून धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून गडचिरोलीत धुडगूस माजवणाऱ्या रानटी हत्तींनी एका वन कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

गडचिरोलीतील वडसा वनविभागातील आरमोरी वनपरिक्षेत्रात धक्कादायक घटना घडली आहे. वन कर्मचारी सुधाकर बापुराव आत्राम (50) यांना एका रानटी हत्तीने सोंडेत उचलून आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते वन विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होते.

नेमकं काय घडलं?

गडचिरोलीच्या आरमोरी वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. या रानटी हत्तींना पिटाळून लावण्यासाठी वन कर्मचारी आणि गावातील नागरिक प्रयत्न करीत होते.

अशावेळी वाहन चालक म्हणून कार्यरत वन कर्मचारी हे घटनास्थळी उभे होते. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या रानटी हत्तीने सुधाकर आत्राम यांना सोंडेत उचलले. त्यानंतर आदळ आपट करून ठार केले. या घटनेने वनविभागातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

तत्पूर्वी, ओदिशा राज्यातून आलेल्या हत्तींनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलं आहे. गेल्या दोन महिन्यांत एका वृद्धानेही रानटी हत्तीमुळे जीव गमावला होता. त्यामुळे या रानटींमुळे स्थानिक नागरिाकंना जीन मुठीत धरून राहावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT