Mumbai crime: सोशल मीडियावर १० लाख फॉलोअर्स; गर्लफ्रेंडसाठी करायचा चोरी, मजेसाठी गाठायचा गोवा

Influencer Burglary: चांगली जीवनशैली आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला साकीनाका पोलिसांनी अटक केलीय.
Influencer Burglary
Influencer BurglarySaam Tv
Published On

Social media Influencer:

चांगली जीवनशैली आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला साकीनाका पोलिसांनी अटक केलीय. सोशल मीडियावर या इन्फ्लुएन्सरला तब्बल १० लाख फॉलोअर्स आहेत. एका प्लंबरच्या घरी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी या सोशल मीडियाला स्टारला ५ सप्टेंबर रोजी साकीनाका पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यांच्याकडून ३.३ लाख रुपये जप्त केली आहेत.(Latest News)

अभिमन्यू गुप्ता ( वय ३१) असं अटक करण्यात आलेल्या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. अभिमन्यू गुप्ता हा रांची येथील रहिवाशी आहे. गुरुवारी रात्री अभिमन्यूने साकीनाका येथील एका वाटर प्युरिफ्यार वितरक मोहम्मद शेख यांच्या प्लॅटमध्ये चोरी केली होती. एका कामगाराच्या साक्षीनं अभिमन्यूला पोलिसांनी अटक केली. शेख यांच्या घरातून त्याने सोन्याची दागिने लंपास केली.

चोरी केल्यानंतर अभिमन्यू विमानाने रांची येथे पळून गेला होता. चोरी झाली त्यादिवशी शेख यांच्या घरी कोणीच नव्हते. शेख जेव्हा घरी परत आले तेव्हा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान अभिमन्यूवर मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे अशा विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या चार वर्षात त्याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला जुगाराचं व्यसन आहे. साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या केल्याप्रकरणी अभिमन्यूनं सात वर्षाचा कारावास भोगलाय. परंतु तुरुंगातून सुटल्यानंतर तो परत चोरी करायचा.

चोरी केल्यानंतर तो गोवा किंवा रांचीला विमानाने निघून जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी अभिमन्यू चोरी करायचा. या चोरीच्या पैशातून तो कशिनोमध्ये जुगार खेळायचा आणि ब्रँडेड कपड्याची खरेदी करायचा. चोरी करण्याआधी अभिमन्यू हा त्या ठिकाणाची रेकी करायचा, अशी माहिती झोन एक्सचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. ज्यावेळी अभिमन्यूची ओळख पटली तेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक पथक बनवलं.

पोलिसांनी चोरी झालेल्या घराजवळील सीसीटीव्ही तपासले त्यात अभिमन्यू चोरी करून घराबाहेर पडताना दिसला. अभिमन्यूची चोरी करण्याची स्टाईल ही युनीक होती. चोरी करायला जाताना तो कधीच चेहऱ्यावर मास्क लावत नसायचा. त्याच्या मोड्स ऑपरेडीमुळे त्याला पकडण्यात मदत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Influencer Burglary
Vande Bharat Train: मुंंबई-पुणे मार्गावरील इतर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारतचे प्रवास भाडे महाग, जाणून घ्या किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com