Vande Bharat Train: मुंंबई-पुणे मार्गावरील इतर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारतचे प्रवास भाडे महाग, जाणून घ्या किती?

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घानासाठी नव्या वंदे भारत ट्रेन सज्ज झाल्या असून त्यांच्या तिकिट दरांबद्दल सध्या महत्वाची बातमी समोर येत आहे.
Vande Bharat trains Mumbai
Vande Bharat trains MumbaiTwitter/ @RailMinIndia
Published On

Vande Bharat Express Tickets Price: गेल्या महिन्यात मुंबई दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. १० फेब्रूवारीला पंतप्रधानांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते दोन नव्या वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घानासाठी नव्या वंदे भारत ट्रेन सज्ज झाल्या असून त्यांच्या तिकिट दरांबद्दल सध्या महत्वाची बातमी समोर येत आहे. या माहितीनुसार मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनची तिकीटे इतर ट्रेनपेक्षा महाग असणार आहेत. (Mumbai)

Vande Bharat trains Mumbai
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाचं! PM मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईत अलर्ट, 'या' भागात ड्रोन, पतंग उडवण्यास बंदी

काय असेल तिकीट दर...

नवीन वंदे भारत ट्रेनने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना चेअर कार (CC) साठी 560 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर (EC) कारसाठी 1,135 रुपये मोजावे लागतील. पुण्याला जाण्यासाठी हा सर्वात जलद रेल्वे प्रवास असेल कारण मुंबईपासून फक्त 3 तास लागतील. त्याचबरोबर प्रवाशांना शिर्डीला पोहोचण्यासाठी सहा तास आणि सोलापूरला जाण्यासाठी ५ तास ३० मिनिटे लागतील.

तसेच या ट्रेनमधून नाशिकपर्यंत प्रवासासाठी ५५० रुपये आणि सीसी आणि ईसीसाठी ११५० रुपये तिकीट दर असेल. र साईनगर-शिर्डी साठी 800 रुपये आणि CC आणि EC साठी 1,630 रुपये दर अपेक्षित आहे.

Vande Bharat trains Mumbai
Maharashtra Politics : ठाकरे गटातील नेत्यांवर अटकेची टांगती तलवार; नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, मुंबई आणि सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस भोर घाटातून (पुण्याच्या मार्गावर कर्जत आणि खंडाळा दरम्यान स्थित) धावण्याची शक्यता आहे आणि सुमारे 455 किमीचे अंतर 6.35 तासांत कापण्याची अपेक्षा आहे. मुंबई-शिर्डी ट्रेन थळ घाटातून (मुंबईजवळील कसारा परिसरात) धावेल आणि 5.25 तासांत 340 किमी अंतर कापेल. (Narendra Modi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com