Bogus Teacher google
महाराष्ट्र

Jalgaon News: बोगस ४९ शिक्षकांना ५० हजार पगार, नाशिकच्या लेखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Bogus Teacher: जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली. यामुळे शासनावर आर्थिक भार पडला आणि संबंधित शिक्षण संस्थांचे जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Dhanshri Shintre

जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणात ४९ शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात आले आणि त्यांना शासन तिजोरीतून दर महिन्याला ५० हजार रुपये वेतन दिले जात होते. या प्रकारावरुन शिक्षण क्षेत्रातील एक मोठी फसवणूक समोर आली आहे.

या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि जळगाव माध्यमिक बितन पथकाचा अधीक्षक यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यासोबत संगनमत करून शिक्षकांची बोगस भरती केली आणि त्यांच्या नावावर शासनाकडून वेतन मंजूर करून घेतले असे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे.

रामकृष्ण अभिमन पाटील यांनी या बोगस शिक्षकांच्या बाबतीत तक्रार केली होती, त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीनंतर तक्रारीत दिलेल्या माहितीला सत्यता आढळली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अशी फसवणूक होणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, यामुळे शिक्षण व्यवस्थेतील असंख्य समस्यांवर उघडकीस आले आहेत. हे प्रकरण शिक्षण क्षेत्रातील जबाबदार लोकांसाठी एक इशारा ठरू शकते, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

या बोगस शिक्षक ५० हजार रुपये वेतन शासन तिजोरीतून देण्यात आले आहे. याप्रकरणी दीड लाख रुपये वेतन असलेल्या नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी जळगाव माध्यमिक वेतन पथकाचा अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरून शिक्षण विभागाने ६८ शिक्षकांच्या नावे १९.५० कोटी रुपयांची बिले मंजूर केली होती.

हा अपहार मान्य करूनही शिक्षण विभागाला यात कोणीही दोषी सापडत नसल्याचे साम टीव्ही ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शिक्षण उपसंचालक यांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे. पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यासोबत संगनमत करून ही फसवणूक करण्यात आल्याचे के प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

SCROLL FOR NEXT