Nanded Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime : राजस्थानच्या टोळीचा नांदेडमध्ये दरोडा; 5 आरोपी जेरबंद

नांदेड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

Nanded Crime News : नांदेडमध्ये भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या राजस्थानच्या टोळीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. जागरुक महिलेने 112 नंबर मदतीचा काॅल करताच पोलिसांनी प्रतिसाद देत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वेदांत नगर भागात घडली आहे.

विकास शर्मा हे सकाळीच कामा निमित्त घराबाहेर पडले, त्याच वेळेस त्यांच्या घरावर पाळत ठेवणारे पाच दरोडेखोर शर्मा यांच्या घरात शिरले. दरोडेखोरांनी विकास शर्मा यांच्या घरात शिरून त्याच्या कुटुंबीयाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याची घटना होती. 

यावेळी शर्मा यांच्या पत्नीने 112 नंबरवर काॅल करुन पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने प्रतिसाद देत घटनास्थळावर दाखल झाले आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

प्रदिप स्वामी, पवनकुमार जाट, राजेंद्र कुमार जाट, पंकज स्वामी, मनिष सेन असे ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दरोडेखोरांपैकी एक प्रदिप शर्मा हा दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

मास्टरमाइंड प्रदिप स्वामी हा विकास शर्मा यांच्या घराच्या टाईल्स फरशीचे काम करण्यासाठी आला होता. त्यानेच हा संपुर्ण दरोड्याचा प्लान रचल्याची बाब उघड झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

SCROLL FOR NEXT